जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे नवनिर्वाचित सचिव पांडुरंग नागेश्वर यांचा श्रावण पाटलांनी केला सत्कार…

सय्यद जाफर
नायगांव :- नांदेड जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या सचिवपदी नरसीचे भूमिपुत्र पांडुरंग नागेश्वर यांची नुकतीच बहुमताने निवड झाल्यानंतर त्यांचा नरसीत श्रावण पाटील भिलवंडे यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला.
नांदेड जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीमध्ये अध्यक्षपदी अशोक कासराळीकर यांची तर उपाध्यक्षपदी रवी क्षिरसागर व सचिवपदी पांडुरंग नागेश्वर नरसीकर यांची बहुमताने निवड करण्यात आली. नरसीचे भूमिपुत्र असलेले ग्रामपंचायत अधिकारी पांडुरंग नागेश्वर यांची पतसंस्थेचे सचिव म्हणून निवड झाल्यामुळे भाजपा नेते श्रावण पाटील भिलवंडे मित्र मंडळाकडून नरसीतील त्यांच्या निवासस्थानी सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन गजानन भिलवंडे, ग्रामपंचायत सदस्य सय्यद ईस्माईलसाब, माजी चेअरमन मारोती पाटील भिलवंडे, वसंत कस्तुरे, साईनाथ अक्कमवाड, बालासाहेब गंगासागरे, चंदु कोकणे, राम खनपटे, रावसाहेब ताटे, विनोद भिलवंडे, रमेश वासरे, खाकीबा सुर्यवंशी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.