वाढदिवसायरचा खर्च टाळून मयत गणेश डुबुकवाड यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत

मोरे मनोहर
किनाळा :- पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगुन पोलीस भरतीसाठी धावण्याचा व व्यायामाचा नियमित सराव करणाऱ्या शंकरनगर तालुका बिलोली येथील तरुण गणेश कोंडीबा डुबुकवाड वय वर्ष 22 या तरुणाचा विद्युत मंडळाच्या निष्काळजीपणामुळे खांबावरील लोंबकळत असलेल्या विजेच्या ताराचा दि. 20 जून रोजी शॉट लागून तो गंभीर जखमी झाल्याने त्यांचा नांदेड येथे उपचार सुरू असताना त्यांचा 28 जून रोजी पहाटेच्या सुमारास दुःखद निधन झाले हि दुःखद घटना गणेश डुबुकवाड यांच्या कुटुंबीयांवर आल्याने रामतीर्थ तालुका बिलोली येथील नायगाव मार्केट कमिटीचे माजी संचालक संतोष पाटील पुयड यांनी आपल्या वाढदिवसावर केला जाणारा खर्च टाळून ही खर्चाची रक्कम डुबुक वर कुटुंबीयांना देऊन आपला वाढदिवस साजरा केल्याने आजही माणुसकी शिल्लक असल्याचे यावरून दिसून येते.
एकुलता एक असलेल्या गणेश डुबुकवाड यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवरदुःखाचा डोंगर कोसळल्याने त्यांना या दुःखातून सावरण्यासाठी शंकरनगर परिसरातील अनेक सुज्ञ नागरिक, कार्यकर्ते, व्यापारी, सामान्य मजूरदार अशा अनेकांनी गणेश डुबुकवाड यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात पुढे करत माणुसकी जोपासण्याचे कार्य करत असताना रामतीर्थ तालुका बिलोली येथील नायगाव मार्केट कमिटीचे माजी संचालक संतोष पाटील यांचा 3 जुलै रोजी होणारा वाढदिवस व या वाढदिवसानिमित्त केला जाणारा खर्च हा वायफळ खर्च न करता संतोष पाटील यांनी आपला वाढदिवसा वरील खर्च आपल्या असंख्य मित्र मंडळाच्या उपस्थितीत डुबुकवाड कुटुंबीयांना ही रक्कम सुपूर्द करत आपला वाढदिवस साजरा केले असल्याने आजही माणुसकी शिल्लक असल्याचे यावरून दिसून येते.
यावेळी संतोष पाटील पूयड,हाणमंत पाटील वाडेकर, गंगाधर कांबळे, सुनील कांबळे, ब्रह्मा कांबळे, अमजद पठाण, हनमंत पंधरवाडे, संजय शेरे, गणेश रोकडे, मोगलाजी डुबुकवाड, राजू डुबुकवाड, आसिफ शेख, बाळू राठोड, हनमंत पंधरवाडे, मारुती पंधरवाडे, राजू डुबुकवाड, कोंडीबा डुबुकवाड यासह गावातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.