डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या बिलोली तालुकाध्यक्ष पदी यादवराव लोकडे तर सचिव पदी मार्तंड जेठे यांची निवड..
⚡ जिल्हाध्यक्ष खंदारे यांनी दिले नियुक्तीपत्र

New Bharat Times नेटवर्क
बिलोली : तालुक्यात डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची कार्यकारणी जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत नुकतीच जाहीर करण्यात आली असून तालुकाध्यक्ष पदी यादवराव लोकडे तर सचिव पदी मार्तंड जेठे यांची निवड करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात योगदान देऊन सामाजिक, शैक्षणिक, राजकीय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करून आपल्या कामाचा वेगळा ठसा बिलोली तालुका व नांदेड जिल्ह्यात महा लाईव्ह च्या माध्यमातून यादवराव लोकडे यांनी निर्माण केले आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या नांदेड जिल्हा कार्यकारणीने यादवराव लोकडे यांना बिलोली तालुक्याची जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आले असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रवीण खंदारे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले, सोबतच सचिवपदी मार्तंड जेठे, कार्याध्यक्ष प्रवीण सोनकांबळे, उपाध्यक्ष देविदास कोंडलाडे, संघटक कमलाकर जमदाडे, कोषाध्यक्ष गौतम वाघमारे, सदस्य विजयकुमार सोनकांबळे, शादुल शेख, संदीप बंडे आदी कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण खंदारे, जिल्हा सचिव प्रवीण देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी हंबर्डे, जिल्हा सहसचिव कुवरचंद मंडले, जिल्हा कोषाध्यक्ष महेंद्र देमगुंडे, जिल्हा कार्याध्यक्ष कुलदीप नंदुरकर, महानगराध्यक्ष नकुल जैन आदींची उपस्थिती होती तर सदर निवड झालेल्या नूतन कार्यकारणीस विविध स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.