वाळू वाहतूक करणारे २ हायवा दहिकळंबा परिसरात पकडलेमहसूल विभागाची कारवाई

बालासाहेब शिंदे
मारतळा :- दहिकळंबा परिसरात वाळूची अवैधरित्या वाहतूक करणारे २ हायवा पकडण्यात आले. दि. ५ जुलै रोजी महसूल पथकाने ही कारवाई केली. उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी अवैध वाळू उपसा व वाहतूकीविरूद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
यानूसार नायब तहसीलदार रेखा चामनर व त्यांच्या पथकाने दहिकळंबा परिसरात एमएच २० ईएल ८९६९ ही हायवा (मालक ज्ञानेश्वर भीमराव पांडुरणे) व एमएच २६ बीई ४०८७ ही दुसरी हायवा (मालक पांडुरंग माधवराव ढेपे, रा.मारतळा, ता.लोहा) विना परवाना वाळू वाहतूक करताना आढळून आल्या. महसूल पथकाने दोन्ही वाहने ताब्यात घेऊन त्यामधील अंदाजे ५ ब्रास वाळू जप्त करून पंचनामा करण्यात आला.
ही कारवाई नायब तहसीलदार रेखा चामनर, शिपाई शिवराज लघुळे व वाहनचालक मिर्झा समीर बेग यांच्या संयुक्त पथकाने पार पाडली. या दोन्ही हायवा उस्माननगर पो स्टेला येथे जमा करण्यात आली. यावेळी पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. या कारवाईमुळे परिसरात अवैध वाळू वाहतुकीस चाप बसण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे.