गोदावरी मनार कारखाना सुरू करावे म्हणून हिपरग्याच्या सरपंचांनी घेतले अजितदादांची भेट

मोरे मनोहर
किनाळा :- शंकरनगर तालुका बिलोली येथील गोदावरी मनार सहकारी साखर कारखाना बंद पडल्यामुळे शेकडो बेरोजगारावर उपासमारीची वेळ आली असल्याने बेरोजगाराच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी बंद पडलेला हा कारखाना शासनाने तात्काळ चालू करावे यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची हिप्परगा माळ येथील सरपंच तिरुपती पाटील डाकोरे यांनी भेट घेऊन हिप्परगा माळ येथील शेतकऱ्यांसाठी कॅनॉल मंजूर करून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केले.
माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी शंकर नगर परिसरातील बेरोजगारांच्या हाताला रोजगार मिळावा या दूरदृष्टीकोणातून 1980 मध्ये गोदावरी मनार सहकारी साखर कारखाना सुरू करून अनेक तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून दिले होते परंतु हा कारखाना गेल्या अनेक वर्षापासून बंद पडल्याने शंकरनगर परिसरातील नागरिकांना कामाच्या शोधात वन वन भटकण्याची वेळ आली असल्याने कित्येक तरुण कामाच्या शोधात मुंबई पुणे हैदराबाद अशा ठिकाणी जावे लागत असल्याने त्यांच्या कुटुंबात असलेल्या वयोवृद्ध माता-पिता व लहान बालकांची मोठ्या प्रमाणात बेहाल होत आहे.
बिलोली तालुक्यात एकही मोठा उद्योग किंवा एम .आय. डि. सी. नसल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली असूनदिवसेंदिवस वाढत चाललेल्या बेरोजगारीचे चित्र बदलण्यासाठी तालुक्यात उद्योग-व्यवसायाला चालना देण्याची आवश्यकता असून तालुक्यात सर्वात मोठा उद्योग व्यवसाय म्हणून नावारूपाला असलेला आणि राज्य महामार्गावर असलेला एकमेव गोदावरी मनार सहकारी साखर कारखाना असुन माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी कै. शंकररावजी चव्हाण यांच्या शुभहस्ते सुरू केलेला गोदावरी मनार सहकारी साखर कारखाना सुरू केल्यानंतर शंकरनगर येथे मराठी व इंग्रजी माध्यमांचे पहिली पासून ते पदवीपर्यंत दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्था कार्यरत असल्याने अनेकांचे पाल्य येथे शिक्षणासाठी आहेत मात्र शिक्षण घेऊन बेरोजगार असलेल्या अनेक तरुणांना रोजगार नसल्याने रोजगारासाठी परराज्यात जाण्याची वेळ येत असल्याने सुशिक्षित बेरोजगार व शेतकरी यांचा कामधेनू असलेला हा कारखाना शासनाने तात्काळ सुरू करून शेतकरी व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी 15 जुलै रोजी हिप्परगा माळ येथील सरपंच तिरुपती पाटील डाकोरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन मागणी केली आहे.
हिप्परगा माळ तालुका बिलोली येथील शेतकऱ्यांना शेतीला पाण्यासाठी सिंचनाची कसलीही व्यवस्था नसल्याने येथील शेतकऱ्यांना निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते यामुळे हिप्परगा माळ येथील शेतकऱ्यावर शेतीच्या आर्थिक नुकसानी मुळे अनेक शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बारूळ धरणातून पूर्व दिशेकडून एक आणि पश्चिम दिशेकडून एक असे दोन कॅनॉल गावापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरून जातात मात्र याचा गावकऱ्यांना फायदा होत नसल्याने हे कॅनॉल येथील शेतकऱ्यांसाठी कॅनॉल मंजूर करून शेतीसाठी सिंचनाच्या पाण्याची व्यवस्था निर्माण करून द्यावे अशीह मागणी हिप्परगा माळ येथील सरपंच तिरुपती पाटील डाकोरे यांनी राजाचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली आहे.