हॉटेल कावेरी यांचेतर्फे भाविकांना फळ वाटप…

नायगाव :- नवदुर्गा महोत्सव अंतर्गत नरसी येथिल प्रसिद्ध बालाजी मंदिर येथे मुखेड मार्गे नरशी कडे दर्शनासाठी पायी जाणाऱ्या शेकडो भाविक भक्तांना कार्ला फाटा येथे फळ वाटप व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था विधान परिषदेचे मा. आमदार श्री.राम पाटील रातोळीकर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार हॉटेल कावेरी चे मालक श्री.संतोष कंधारे व मित्र परिवाराच्या वतीने भक्तांना फळे वाटप व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली.
यावेळी भाविक भक्तांना केळी वाटप व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करताना रातोळी येथील रहिवाशी तथा ग्रा.पं.सदस्य प्रतिनिधी हॉटेल कावेरी चे मालक श्री.संतोष कंधारे व रातोळी येथील ग्रामपंचायत अधिकारी श्री.बालाजी पाटील रातोळीकर, सरपंच प्रतिनिधी श्री.राहुल पाटील, श्री.वसंत टाकळे, श्री.नारायण सोडवाड, श्री.नामदेव कंधारे, श्री.आकाश कंधारे, श्री.रामेश्वर पवार आदी मित्र परिवाराच्या उपस्थित भाविकांना फळे वाटप व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. यावेळी महिला, पुरुष व शेकडो भाविकांनी फळे व पिण्याच्या पाण्याचा लाभ घेतला.
हॉटेल कावेरी चे मालक श्री.संतोष कंधारे यांच्याकडून सदभक्तांना फळे वाटप व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्याबद्दल मा. आमदार श्री.राम पाटील रातोळीकर व इतर मान्यवराकडून श्री.संतोष कंधारे यांच्या उपक्रमाबद्दल कौतुक करण्यात आले.



