ताज्या बातम्यानांदेडनायगांव

शेळगाव गौरीच्या डॉ.नंदेश्वर बलेगावे यांचा देशात पाचवा क्रमांक देवघर येथील AIMS हॉस्पिटलमध्ये रुजू

शेषेराव कंधारे

नायगाव :- महाराष्ट्रात नावारूपाला आलेल्या आणि दोन वेळा राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या शेळगाव गौरी गावातील डॉ.नंदेश्वर गोपीनाथ बलेगावे यांनी उज्वल यश संपादन केले आहे. संपूर्ण देशभरातून घेण्यात आलेल्या CRE परीक्षेत एकूण १००० विद्यार्थ्यांमधून देशात पाचवा क्रमांक मिळवून त्यांनी मोठे यश प्राप्त केले असून झारखंड राज्यातील देवघर येथील AIMS हॉस्पिटलमध्ये ते रुजू झाले आहेत.

डॉ.नंदेश्वर बलेगावे यांचे प्राथमिक शिक्षण कै.रामचंद्र पाटील विद्यालय, शेळगाव गौरी येथे झाले. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण संत ज्ञानेश्वर विद्यालय, धुप्पा येथे पूर्ण केले. पुढे त्यांनी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. डॉ.नंदेश्वर यांच्या या यशाबद्दल शेळगाव गौरीचे भाग्यविधाते तथा महाराष्ट्र राज्याच्या ग्रामस्वच्छता समितीचे प्रथम अध्यक्ष माधवरावजी पाटील शेळगावकर यांनी त्यांचे कौतुक केले.

यावेळी प्राचार्य संजय पाटील शेळगावकर, प्राचार्य सरोज पाटील शेळगावकर, मोतीराम पाटील शिंपाळे, उत्तमराव पाटील, मुख्याध्यापक अशोक पाटील बावणे, राजेंद्र पाटील, विजय पाटील, माधवराव घाटोळे, माधव वाढवणे, हुसेनसाहेब, संभाजी पाटील, नवनाथ शिंपाळे, तुकाराम वाघमारे यांच्यासह ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker