रामतीर्थ पोलीसांना कोल्हे बोरगाव चोरीच्या तपासात यश दोन आरोपीसह मुद्देमाल जप्त

मोरे मनोहर
किनाळा :- रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोल्हे बोरगाव येथे दिनांक 30 मे ते 01 जुन 2025 रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरांनी घरफोड्या करुन लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्यात यशस्वी झाले होते मात्र रामतीर्थ पोलीस ठाण्यात सपोनी विक्रम हराळे नव्याने रुजू झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मदतीने अवघ्या दोन महिन्यात घरफोड्या केलेल्या दोन आरोपींना बेड्या ठोकून 1,45000/- हजार रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात रामतीर्थ पोलिसांना यश आले असल्याने सपोनी विक्रम हराळे यांचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.
कोल्हे बोरगाव तालुका बिलोली येथे एकच रात्री चार जणांच्या घरफोड्या करून अज्ञात चोरटे फरार होण्यात यशस्वी झाल्याने या तपासाचे पोलिसांसमोर मोठे आव्हान असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनी विक्रम हराळे यांनी तपासाची चक्र फिरवली असता कोल्हे बोरगाव येथील घरफोड्या करणारे बळीराम विश्वनाथ कुसळकर राहणार सांगवी नांदेड हा आणि राहुल रमेश मुदाळे राहणार उदगीर जिल्हा लातूर यांना अटक केली असून त्यांच्या कडून गुन्ह्यातील गेलेला मुद्देमाल दोन मोटरसायकली व 1,45000/- हजार रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त केले असून सदर गुन्ह्याचा अधिकचा तपास सपोनि विक्रम हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली रामतीर्थ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नरवाडे हे करीत आहेत.
रामतीर्थ पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेले एसबीआय बँकेचे एटीएम दि.19 सप्टेंबर रोजी पहाटे गॅस कटरने एटीएम कापून एटीएम मधे असलेली सुमारे 20 लाख 43 हजार रुपये चोरून नेल्याची घटना घडली होती हि घटना झाल्यानंतर धुप्पा पाटीजवळ दोन फायनान्स एंज्टला तिन अज्ञात चोरट्याने गाडी आडुवुन दुपारी चोरट्यांनी रोकड पळवली होती यामुळे शंकरनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र रामतीर्थ पोलीस ठाण्याचे नव्याने रुजू झालेले सपोनी विक्रम हराळे यांनी किनाळा तालुका बिलोली येथील एका तरुणाला अज्ञात वाहनाने उडवले.
मात्र बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या या तरुणाचा मोबाईल लोकेशन वरून अवघ्या वीस मिनिटात शोध घेऊन त्या तरुणाचा जीव वाचवले तर कोल्हे बोरगाव येथील घरपोडी करणारे दोन आरोपी अटक करून मुद्देमाल जप्त केल्याने चोरट्यांचे धाबे दणाणले असून अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून अनेक चोरीचे गुन्हे उघड होतील अशी चर्चा केली जात असल्याने पोलिसांच्या या तत्पर सेवेबद्दल त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असुन या घटनेचा पुढील तपास सपोनि विक्रम हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली रामतीर्थ पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक शिवराज नरवाडे हे करीत आहेत.



