ताज्या बातम्यानांदेडबिलोली

रामतीर्थ येथील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी हनमंत पाटील देगलूरे यांची बिनविरोध निवड

मोरे मनोहर

किनाळा :– रामतिर्थ तालुका बिलोली येथील दिनांक 28 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेली ग्रामसभा अतिवृष्टी होऊन झालेल्या पावसामुळे रद्द करण्यात आली होती हिच ग्रामसभा चार सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये ग्रामविकास अधिकारी श्री प्रसाद जाधव यांनी ग्रामसभेचे विषय व शेतकऱ्या बद्दल माहिती सांगून तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदासाठी निवड करण्याचे सुचवले असता यावेळी सर्वानुमते हनमंत शिवाजीराव पाटील देगलूरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

गावातील लहान मोठे तंटे गावातच मिटले पाहिजे हा दूरदृष्टीकोण ठेवून शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या माध्यमातून वाढणाऱ्या अनेक गुन्ह्यावर अंकुश ठेवून वाढणारे गुन्हे कमी करण्याच्या दृष्टीने प्रत्येक गावात तंटामुक्त समिती स्थापन करून गावातील तंटे गावातच मिटले पाहिजे हा दृष्टिकोन शासनाचा असल्याने याच दृष्टिकोनातून रामतीर्थ तालुका बिलोली येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाची अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी हनमंत शिवाजीराव पाटील देगलूरे यांची बिनविरोध निवड झाल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ.मनीषाताई राजेंद्र पाटील तोडे, उपसरपंच सौ.जयश्रीताई मुरलीधर पाटील देगलूरे, ग्रामसेवक श्रीप्रसाद जाधव यांच्या वतीने नवनिर्वाचित तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हनमंत शिवाजीराव पाटील देगलूरे यांचे स्वागत करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिले यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker