गावाकडच्या बातम्यानांदेडबिलोली

नवरात्रोत्सवात कुंडलवाडी येथे दररोज महाप्रसादाचे वाटप ; श्री.भक्ति व श्री.भगवती दोन्ही नवरात्र दुर्गा महोत्सव समितीच्या वतीने उपक्रम

कुंडलवाडी :- नवरात्र उत्सवास दि.२२ सप्टेंबर पासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे.शहरातील वंजार गल्ली येथील श्री भक्ति व श्री भगवती दोन्ही नवरात्र दुर्गा महोत्सव समितीच्या ठिकाणी मागील ४ वर्षापासून नवरात्रोत्सवात नऊ दिवस महाप्रसाद (भंडारा) आयोजन केल्या जात आहे.

श्री.भगवती दुर्गा मातेची स्थापना सन १९९५ तर श्री भक्ती दुर्गा मातेची स्थापना सन २००० मध्ये झाली आहे. वंजार गल्लीतील मूर्ती बनवणारे कलाकार आहेत. त्यांच्या हस्ते मातेची मूर्ती करण्यात येते व मूर्ती स्थापनही त्यांच्याच हस्ते केल्या जाते, हे खास वैशिष्ट्य आहे. येथे दररोज सायंकाळी मातेची आरती भजनी मंडळ समितीचे सदस्य करतात. या महाप्रसादाचा लाभ कुंडलवाडी शहरातील भाविक भक्त मंडळी घेतात. कुंडलवाडी शहर व परिसरातील भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक वंजारी समाज बांधवांच्यावतीने करण्यात आले आहे.

श्री.भगवती नवरात्र उत्सव समितीचे अध्यक्ष विजय पोतनकर, उपाध्यक्ष दत्तु हमंद, कोषाध्यक्ष शिवा खांडरे, सचिव शिवा गंगोने सहसचिव भुरावार, व समितीचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत व श्री भक्ती नवरात्र उत्सव समितीचे अध्यक्ष राजु हमंद, उपाध्यक्ष कृष्णा करपे, कोषाध्यक्ष जगदीश हमंद, अजय भोरे, सचिव बंटी साठे सह सचिव साई भोरे व सर्व सदस्य व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker