ताज्या बातम्यानांदेडबिलोली

कुंडलवाडी नगरपरिषद नगरसेवकांच्या ओबीसी व ओपन महिला प्रवर्गाचे रविवारी फेर आरक्षण

कुंडलवाडी :– येथील नगर परिषदेच्या आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये दहा प्रभागाच्या २० जागेसाठी आरक्षण सोडत नगर परिषदेच्या सभागृहात दि.८ आँक्टोबर रोजी उपजिल्हाधिकारी क्रांती डोंबे यांच्या उपस्थितीत काढण्यात आले होते आरक्षण सोडत काढत असताना प्रभाग क्र. चार मध्ये दोन्ही ही जागा सर्वसाधारण व प्रभाग क्र.पाच मध्ये दोन्ही ही जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आले होते.

या प्रक्रियेवर मनसे अध्यक्ष मनसे शहराध्यक्ष साहेबराव कोंडावार यांनी आक्षेप नोंदवला होता. यानंतर निवडणूक आयोगाकडे निवडणूक आयोगाकडून कुंडलवाडी नगरपरिषदेच्या नगरसेवक पदाचे ओबीसी व ओपन प्रवर्गातील महिलांसाठी चे फेर आरक्षण रविवार दि.१२ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता नगरपरिषद कार्यालयात काढण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker