ताज्या बातम्यानांदेडनायगांव

नायगाव तालुका अल्पसंख्याक कार्याध्यक्षपदी प्रा. समदानी रब्बानी सय्यद शेळगावकर यांची नियुक्ती

New Bharat Times नेटवर्क

नायगाव :- भारतीय जनता पार्टी नायगाव तालुक्याच्या वतीने तालुका अल्पसंख्याक विभागाच्या कार्याध्यक्षपदी प्रा.समदानी रब्बानी सय्यद शेळगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती भाजप नायगाव तालुक्याचे (दक्षिण) अध्यक्ष श्रीहरी देशमुख नरंगलकर यांनी केली. हे नियुक्तीपत्र आमदार राजेश पवार साहेब यांच्या हस्ते प्रा.समदानी रब्बानी सय्यद शेळगावकर यांना प्रदान करण्यात आले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा सरचिटणीस पूनमताई पवार, प्रा.डॉ.मनोहर तोटरे सर, बाबासाहेब पाटील हंबर्डे, परमेश्वर पाटील धानोरकर, साहेबराव पाटील हेंडगे, माधव पाटील घाटोळे, गणेश कंदुरके, श्रीराम पाटील सुगावे, मारोती कदम खंडगावकर, अनिल गिरी बोरगाव, राजू पाटील जाधव कांमरसपिळकर यांच्यासह अनेक मान्यवर व पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना आमदार राजेश पवार साहेब यांनी पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी तसेच अल्पसंख्याक समाजातील सामाजिक प्रश्न, अडचणी व विकासात्मक बाबी प्रभावीपणे मांडून त्या सोडवण्याच्या दृष्टीने सक्रियपणे कार्य करावे, असे आवाहन नवनियुक्त कार्याध्यक्ष प्रा.समदानी रब्बानी सय्यद यांना केले. व कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker