स्व.मधुकरराव पाटील खतगावकर यांच्या पाचव्या पुण्यस्मरणार्थ कीर्तनकार “आई माझी मायेचा सागर फेम” ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज यांचे खतगाव येथे कीर्तन

मोरे मनोहर
किनाळा :- नांदेड जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती, साई शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष स्व.मधुकरराव पाटील खतगावकर यांच्या पाचव्या पुण्यस्मरणार्थ खतगाव ता.बिलोली येथे मंगळवार 6 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता “आई माझी मायेचा सागर फेम, आवाजाचे जादुगार, गायणाचार्य, प्रसिध्द कीर्तनकार ह.भ.प.श्री पुरुषोत्तम पाटील महाराज बुलढाणेकर यांचे कीर्तन आयोजीत केले आहे.
ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज यांच्या गोड, सुमधुर, रसाळ वाणीतून भाविकांना धार्मिक आणि अध्यात्मिक आनंदाची पर्वणी मिळणार आहे. या कीर्तन सोहळयास भाविक-भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहान माजी मंत्री, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. खा.भास्करराव पाटील खतगावकर व समस्त खतगावकर कुटूंबियाच्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास श्रीश्रीश्री 108 महंत शांतीब्रम्ह यदुबन महाराज कोलंबीकर यांचे दिव्य सानिध्य लाभणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खा.डॉ.अजित गोपछडे, खा.रवींद्र पाटील चव्हाण, आ.प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी खा.सुभाष वानखेडे, आ.जितेश अंतापुरकर, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, मोहणअण्णा हंबर्डे, मा.आमदारअविनाश घाटे, माजी आमदार सुभाष साबणे, प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, सौ.वैशालीताई चव्हाण, जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, बाळासाहेब रावणगावकर, प्रदेश सरचिटणीस भास्कर पाटील भिलवंडे, वसंत सुगावे, शहर कार्याध्यक्ष सुरजीतसिंग गील, एमएमआरडीचे सचिव बालाजीराव खतगावकर, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार.
माजी मुख्यमंत्र्याचे ओएसडी वैजनाथ जाधव, नांदेड मनपाचे माजी उपमहापौर आनंदराव चव्हाण, माजी सभापती गणेशराव पाटील करखेलीकर, बिदर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपध्यक्ष अरुण पाटील एकंबेकर, देगलुरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पद्मवार, देगलूरचे नगराध्यक्षा सौ.विजयमाला बालाजी टेकाळे, बिलालीचे नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी, कुंडलवाडीचे नगराध्यक्षा सौ. प्रेरणा कोटलवार, मुखडचे नगराध्यक्षा सौ.विजयाताई देबडवार, उमरीचे नगराध्यक्षा सौ.शकुंतला मुदिराज, लोहा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष शरद पवार.
धर्माबादचे नगराध्यक्ष सौ.संगीता बोलमवाड, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी शिंदे, सभापती शिरीष गोरठेकर, नगरसेवक कैलास गोरठेकर, राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड उत्तरचे तालूकाध्यक्ष दिपक पावडे, बिलोलीचे तालुकाध्यक्ष रणजीत पाटील हिवराळे, देगलूरचे तालुकाध्यक्ष राहुल देसाई, माजी नगराध्यक्ष यादवराव तुडमे, सभापती बाबाराव भाले, उपसभापती आनंदराव बिराजदार, माजी सभापती मंगल देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव कनकंटे आदि उपस्थित राहणार आहेत.
स्वर्गीय मधुकररावजी पाटील खतगावकर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या या सर्व कार्यक्रमास आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भास्करराव पाटील खतगावकर व समस्त खतगावकर कुटुंबीय यांच्यावतीने करण्यात आले आहे.



