श्रीशा मागीलवाड या सहा वर्षीय विद्यार्थिनीची राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड

मोरे मनोहर
किनाळा :- ग्रामीण भागातील एका लहान खेडेगावातील पाळा तालुका मुखेड येथील आर्थिकदृष्ट्या खूप गरीब कुटुंबात जन्म घेतलेल्या श्रीशा यादव मागीलवाड या सहा वर्षीय विद्यार्थिनींने काटेदान एचवायडी येथे आयोजितओपन नॅशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेऊन तिने सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले असुन तिची राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली असल्याने तिच्या या सुयशाचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.
हैदराबाद येथील नायक बुदोकन कराटे अकॅडमी (एनबीकेए), शिवगंगानगर छत्रीनाका येथे गेल्या काही महिन्यांपासून शिकत असलेली सहा वर्षीय विद्यार्थिनी कुमारी श्रीशा यादव मागीलवाड हि काटेदान एचवायडी येथे आयोजित ओपन नॅशनल कराटे चॅम्पियनशिप मध्ये सहभाग घेऊन तिने सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले असुन तिची राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली असल्याने तिच्या या सुयशाचे येथील अकॅडमीचे अध्यक्ष मा-रेड्डी दामोधर रेड्डी आणि एनबीकेएचे अध्यक्ष पी.गणेश नायक यांनी कु.श्रीशा मागीलवाड हिचे अभिनंदन करून तिच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिले.
कु.श्रीशा मागीलवाड हिस विजयाचे ध्येय गाठण्यासाठी कराटे मास्टर्स पी.गणेश नायक व्ही.राजू, पी.राहुल, प्रकाश नाईक यांनी मोलाचे मार्गदर्शन केले असून तिने सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकून तिची राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली असल्याने तिच्या या सुयशाचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.



