धर्माबाद येथे महावितरणच्या उपअभियंत्या कडून अधिनस्त अभियंता व कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक ◆ उपअभियंता विरोधात कार्यकारी अभियंत्याला दिले निवेदन

धर्माबाद :- धर्माबाद येथील वीज वितरण कंपनीचे उपअभियंता बालाजी पांचाळ यांच्याकडून त्यांचे अधिनस्त असलेल्या अभियंता व कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देऊन अपमानास्पद वागणूक देत असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होत असून कर्तव्यावर परिणाम होत आहे. उपअभियंता विरोधात देगलूर येथील कार्यकारी अभियंता यांना कर्मचाऱ्यांनी लेखी निवेदन दिले आहे.
धर्माबाद येथील वीज वितरण कंपनीचे उपाअभियंता बालाजी पांचाळ हे वीज बिल वसुली संबंधात कार्यालयात बैठक न घेता शहरात कुठेही रस्त्यावर अभियंता व कर्मचाऱ्यांना बोलवून बैठक घेऊन तसेच ग्राहकांच्या समोर जोरजोरात अभियंता व कर्मचाऱ्यांना अपमानास्पद बोलून विडीओ करीत आहेत.तसेच वीज ग्राहकांना वीजचोर म्हणून ग्राहकांचा अपमानही करीत आहेत. त्यामुळे उप अभियंत्यांच्या अधिनस्त काम करण्यास अभियंता व कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे.
उपअभियंता पांचाळ यांच्याकडून ग्राहकांना वीजचोर म्हणून संबोधण्यात येत असल्याने धर्माबाद शहरात वीज वितरण कंपनीची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे उपअभियंता पांचाळ यांची बदली करण्याची मागणी होत आहे.



