ताज्या बातम्यानांदेडबिलोली

बिजूर येथील शिवनेरी पोदार लर्न स्कूलमध्ये वार्षिक शैक्षणिक क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ

मोरे मनोहर

किनाळा :- बिजुर तालुका बिलोली येथील केंद्रीय अभ्यासक्रमा नुसार यंदाच्या वर्षापासून सुरुवात करण्यात आलेल्या शिवनेरी पोदार लर्न स्कूल शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त दिनांक २४ जानेवारी रोजी बिलोली न्यायालयाच्या न्यायाधीश सौ.आस्मा सुजित जाधावर, सेवानिवृत्त सुभेदार भीमराव हणमंतराव मुंगडे, संस्थेचे अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर जाधव, डॉ.शिवाजी स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत शैक्षणिक क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.

शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच खेळाचे महत्त्व समजले पाहिजे यासाठी शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या क्रीडा महोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या सौ आस्मा सुजित जाधावर मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना विविध क्रीडा स्पर्धा, कवायत, शिस्तबद्ध संचलन व क्रीडाप्रात्यक्षिकांचे महत्व सांगितले. यावेळी सेवानिवृत्त सुभेदार भीमराव मुंगडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर संस्थेचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर जाधव यांनी विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास घडवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे असे सांगितले.

याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी हे आयोजित करण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता यात अनेक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या किर्णा स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर मंडळीचे संस्थेच्या वतीने कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्वागत करण्यात आले.

शाळेच्या पहिल्याच वर्षी पहिल्यांदच आयोजित करण्यात आलेल्या शैक्षणिक क्रीडा महोत्सवासाठी अतिशय सुंदर असे खेळाडू शाळेतील शिक्षकांनी तयार केले असल्याने शाळेतील शिक्षकांचे पालकांनी त्यांच्या या कार्याचे कौतुक केले. शाळेच्या वतीने घेण्यात आलेल्या या क्रीडा स्पर्धेचे पारितोषिक प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येणार आहेत अशी माहिती शाळेतील शिक्षकांनी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker