पाटोदा येथील के.एम.पाटील माध्यमिक विद्यालयातील सीसीटीव्ही चोरीचा गुन्हा २४ तासात उघड
◆धर्माबाद पोलिसांची कामगिरी ◆दोन आरोपींना केली अटक

धर्माबाद :- तालुक्यातील पाटोदा बुद्रुक येथील के.एम.पाटील माध्यमिक विद्यालयातील शाळेत व शाळा परिसरात लावलेले दोन सीसीटीव्ही कॅमेरे चोरी झाल्याची घटना २० जानेवारी रोजी घडली होती याबाबत २२ जानेवारी रोजी अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल होताच अवघ्या २४ तासात या प्रकरणाचा धर्माबाद पोलिसांनी छडा लावून दोन आरोपींना अटक करून चोरीस गेलेले कॅमेरे जप्त केले आहेत.
तालुक्यातील पाटोदा( बु.) येथील के.एम.पाटील माध्यमिक विद्यालयात शासन निर्णयानुसार शाळेत व शाळेच्या परिसरात १८ कॅमेरे बसवण्यात आले आहेत. दि.२० जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यानी शाळेच्या मैदानातील निलगिरीच्या झाडावर लावलेला एक कॅमेरा व प्रयोगशाळा खोलीच्या स्लॅबवरील बीम वर लावलेला एक असे दोन सीपी प्लस बुलेट दोन कंपनीचे कॅमेरे किंमत १० हजार ४०० रुपयांचे चोरून नेल्याची घटना घडली होती.
याप्रकरणी मुख्याध्यापक दत्तात्रय योगीराज शिंदे यांनी धर्माबाद पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हा दाखल होतात धर्माबाद पोलिसांनी गुन्हा दाखल होताच गुप्त माहितीनुसार पुढील तपास करून आरोपी शुभम नारायण नरवाडे, रा.जारीकोट, व्यवसाय – ऑटो चालक व एक अल्पवयीन मुलगा या दोघांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरी गेलेले कॅमेरे जप्त करण्यात आले आहेत.
सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर पोलीस उपनिरीक्षक बसवंत मुत्येपोड, पोहेकाँ सुनील पत्रे, रावन बारोळे यांनी केली.



