ताज्या बातम्यानांदेडनायगांव

उमरी तहसीलदाराच्या आशिर्वादाने वाळू माफीयांना अच्छे दिन : गोदावरी नदी पात्रातून दिवसरात्र वाळूचा उपसा

प्रकाश महिपाळे

नायगाव : नायगावमध्ये वादग्रस्त ठरलेल्या तहसीलदार मंजुषा भगत यांनी उमरी तालुका वाळू माफीयांना आंदन दिल्याने गौण खनिजाचे वारेमाप उत्खनन तर सुरुच आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे वाळू माफीयांनाही मोकळीक दिल्याने गोदावरी नदी पात्रातून दिवसरात्र वाळूचा अवैध उपसा सुरु आहे. वाळू माफीयांशी संगणमत करुन अधिकारीच शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडवत आहेत होते विशेष.

जिल्ह्यात अवैध वाळूचा विषय सध्या हाँट बनला आहे त्यामुळे प्रत्येजन वाळूच्या धंद्यात माल कमवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. या सर्व प्रकाराला अधिकारी अर्थिक तडजोडी करुन मोकळीक देत असल्याने अवैध वाळूचा धंदा प्रचंड फोफावला आहे. उमरी तहसील कार्यालयाने दररोज दहा हजार रुपये द्या व कुणीही वाळू उपसा करा अशी अफलातून योजना राबवली असल्याने तालुक्यात वाळू माफीयांनी उच्छाद मांडला आहे.

उमरी येथे सध्या कार्यरत असलेल्या तहसीलदार मंजूषा भगत या पुर्वी नायगाव येथे कार्यरत होत्या त्यावेळी त्यांनी आपले पती पोलीस अधिकारी असल्याचा दबदबा निर्माण करण्यासाठी खाजगी कारमध्ये पतीची कँप ठेवत होत्या. त्यामुळे त्या चांगल्याच वादग्रस्त ठरल्या होत्या. उमरी येथे रुजू झाल्यापासून त्यांनी मुरुम, माती आणि वाळू माफीयांना चक्क तालुकाच आंदन देवून टाकल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

तालुक्यातील इज्जतगावसह अनेक ठिकाणी गोदावरी नदी पात्रातून बिनधास्तपणे दिवसरात्र वाळूचा अवैध उपसा सुरु आहे. वाळू माफीया दिवसरात्र वाळूचा अवैध उपसा करत असल्याने गोदावरी नदीचे विद्रूपीकरण तर होतच आहे पण दररोज लाखो रुपयाचा महसूल बुडवल्या जात आहे. विशेषतः शासनाचा महसूल बुडवण्यात अधिकारी मोठ्या प्रमाणात हातभार लावत आहेत.

धर्माबाद उपविभागीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष…
धर्माबादच्या उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे या कठोर व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख आहे परंतु उमरी तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा होत असताना त्यांनी केलेल दुर्लक्ष चर्चेचा विषय ठरला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker