क्राईमताज्या बातम्यानायगांव

महिलेचे दागिने चोरणाऱ्या चोरट्यास नायगाव पोलिसांनी केले जेरबंद

प्रकाश महिपाळे

नायगाव : येथील आठवडी बाजारात मोबाईल चोरट्यांचाच सुळसुळाट होता पण थेट बिड जिल्ह्यातील मंगळसूत्र चोरटे नायगावच्या बाजारात दाखल झाले आहेत. या चोरट्यांनी एका महिलेचे दागिने चोरुन पळ काढताना बिट जमादार साई सांगवीकर यांनी पकडले असून. या चोरट्याच्या विरोधात नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गुरुवारी दि. 5 फेब्रुवारी रोजी दुपारी अंदाजे तीन वाजताच्या सुमारास निर्मलाबाई बालाजी अभंगे वय 53 वर्ष राहणार लालवंडी तालुका नायगाव ही आठवडी बाजार मध्ये आली असता, तिला एका अज्ञात इसमाने माझ्याकडे सोन्याची बिस्किट आहे तुम्हाला देतो असे म्हणून पशुवैद्यकीय सरकारी दवाखाना नायगाव येथील पाठीमागे घेऊन गेला.

तिथे गेल्यावर सदर महिलेला अज्ञात व्यक्तीने त्याच्याकडे दोन सोन्याचे बिस्कीट दाखवून बोलत असताना सदर महिलेला त्या व्यक्तीवर शंका आल्याने तिने ते सोन्याची बिस्किट नाही असे म्हणाले असतात त्या व्यक्तीने निर्मलाबाई हिच्या गळ्यातील चार ग्राम वजनाचे सोन्याचे चंपूल मनी मंगळसूत्र हिसकावून तोडून घेतला व कानातील सोन्याचे फुलं काढून दे नाहीतर तुला जिवे मारतो असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली.

असता सदर महिनेने आरडाओरड केली असता तो व्यक्ती निर्मलाबाई हिच्या गळ्यातील सोन्याचे दागिन्यासह पळून जात तिथून पळून जात असताना आठवडी बाजार पेट्रोलिंग दरम्यान पोलीस हेडकॉन्स्टेबल साईनाथ सांगवीकर यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले. त्या व्यक्तीचे नाव गाव विचारतात त्याने त्याचे नाव गोवर्धन गणपत गोरे वय 35 वर्ष व्यवसाय मजुरी राहणार वाकनपुर तालुका जिल्हा बीड हल्ली मुक्काम नूर कॉलनी गांधीनगर बीड व सलगरा बुद्रुक तालुका जिल्हा लातूर असे सांगितले.

सदर व्यक्तीस ताब्यात घेऊन त्याच्याकडून निर्मलाबाई हिच्या गळ्यातील सोन्याचे चार ग्राम वजनाचे चंपूल मनी मंगळसूत्र अंदाजे किंमत 60000 व बनावट दोन सोन्याचे बिस्किट जप्त केले. त्या महिलेच्या तक्रारी जबाब वरून पोलीस स्टेशन नायगाव गुरं नंबर 28/2026 318(4), 309(4),304(2) BNS प्रमाणे दाखल करून सदरचा गुन्हा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.श्याम पानेगावकर साहेब, पोलीस निरीक्षक श्री सुभाषचंद्र मारकड साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल साई सांगवीकर हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker