ताज्या बातम्यानांदेडनायगांव

नायगाव पंचायत समितीचा भ्रष्ट कारभार पुन्हा चव्हाट्यावर ; घरकुल विभागाच्या डाटा एन्ट्री ऑपरेटरची मुजोरी…

युवा सेनेच्या धुप्पेकरांनी केली निलंबनाची मागणी

सय्यद जाफर

नायगांव :- सामान्य जनतेच्या मूलभूत हक्काचे असलेल्या घरकूल योजनेच्या विविध लाभार्थ्यांना अपमानास्पद वागणूक देत मुजोरी करणाऱ्या नायगांव पंचायत समितीच्या घरकुल विभागातील भ्रष्टाचारी डाटा एंन्ट्री ऑपरेटर मधुकर चव्हाण यांनी आपल्या मनमानी व गैरकारभाराचा कळस गाठला असून अशा भ्रष्टाचारी कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करा अशी मागणी शिवसेना युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ओमप्रकाश धुप्पेकर यांनी निवेदनाद्वारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

तालुक्यातून येणाऱ्या घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची देयके काढण्यासाठी पैशाची मागणी डाटा एन्ट्री ऑपरेटर चव्हाण हे करीत असून त्यांची आर्थिक मिरवणूक करण्याचा उद्योग चालवला आहे. घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची देखे काढून देण्यासाठी तसेच जुन्या नोंदी रद्द करून नव्याने देखील मंजूर करण्याच्या नावाखाली लाभार्थ्यांकडून बेकायदेशीर त्या पैशाची मागणी करीत आहेत. पैसे न दिल्यास लाभार्थ्यांची कामे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्याचा उद्योग चव्हाण यांनी चालू केला आहे. यामुळे गरीब व गरजू नागरिकांची आर्थिक व मानसिक पिळवणूक होत आहे.

मुळात पूर्वीच्या संचिका रद्द करण्याचा अधिकार चव्हाण यांना आहे काय ? पैसे घेऊन कामे होत असतील तर पगार कशासाठी मिळतो. यात अर्थपूर्ण गुंतलेल्या मधुकर चव्हाण यांच्या गैर कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे आणि शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणीही युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ओमप्रकाश धुप्पेकर यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

नायगाव पंचायत समितीचा कारभार सध्या रुळावर आल्याचे दृश्य निर्माण झालेच की, या डाटा एंन्ट्री ऑपरेटर चव्हाणांमुळे पुन्हा त्याला ग्रहण लागून सुरळीत कारभाराला हरताळ फासल्या चालल्याची चर्चा लाभार्थ्यांकडून होत आहे. तालुक्यातील गरीब व सामान्य असलेले घरकुल योजनेची लाभार्थी प्रत्येक दिवस कार्यालयात बिल का पडले नाही. यासाठी खेटे मारत आहेत.

त्यांना समजदारपणे वागणूक न देता मुजोरी भाषा वापरून त्यांचा अपमान करीत कार्यालयाबाहेर निघण्याची तंबी देण्याचा उद्योग या चव्हाणांनी सुरू केला आहे. त्यांच्या या कारभाराचे वाभाडे कार्यालयातच निघत असताना वरिष्ठ अधिकारी गप्प का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

चौकशीचे आदेश… दोषींवर कडक कारवाई करणार – डॉ.तुबाकले
युवा सेनेचे जिल्हाप्रमुख धुपेकर यांनी केलेल्या तक्रारीबाबत जिल्हा परिषद जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ संजय तुबाकले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, निवेदनाची दखल घेण्यात आलेली असून नायगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश ही देण्यात आले आहेत. दोषी आढळल्यास डाटा एन्ट्री ऑपरेटर मधुकर चव्हाण यांच्या वर कडक कारवाई करण्यात येईल असे त्यांनी आमच्या प्रतिनिधीला बोलताना सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker