गावाकडच्या बातम्यानांदेडबिलोली

केरूर येथे मातारमाई आंबेडकर जयंती साजरी

मोरे मनोहर

किनाळा :- माता रमाई आंबेडकर यांचे आयुष्य लहानपणापासूनच हाल अपेष्टा व कष्टात गेले लग्नाच्या नंतरही बाबासाहेब शिक्षणासाठी प्रदेशात असताना गौर्या आणि लाकडाच्या मोळ्या विकुन संसाराचा गाडा चालवला. पोटचा मुलगा मेला तरीही बाबासाहेबांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून बाबासाहेबांना माता रमाईने कळविले सुद्धा नाही. बाबासाहेबांच्या प्रत्येक अडचणीत माता रमाई ठामपणे उभा होत्या माता रमाईच्या या त्यागामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार झालेअसे मत फुले शाहू आंबेडकर क्रांती मंचचे संस्थापक अध्यक्ष भास्कर भेदेकर यांनी व्यक्त केले.

केरूर तालुका बिलोली येथे दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी त्याग मूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माता रमाई आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजमाता माता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी देवदेवतांची पूजा करण्यापेक्षा महिलांनी माता रमाई अहिल्यादेवी होळकर सावित्रीबाई फुले माता जिजाऊ यांचे पूजन करावे व त्यांचे विचार आत्मसात करावे अशी भावना सामाजिक कार्यकर्त्या पंचफुलाताई वड्डे यांनी व्यक्त केल्या.

याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे, फुले शाहू आंबेडकर क्रांती मंचचे संस्थापक अध्यक्ष भास्कर भेदेकर, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रणरागिनी सौ.वडेताई, सरपंच बालाजी कुर्नापल्ले यांनी माता रमाई यांच्या जीवन कार्यावर आपले सविस्तर मनोगत व्यक्त केले. माता रमाई जयंती निमित्त महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भीमशाहीर गौतम भालेराव पोखर्णीकर व महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका दिपाली लातूरकर यांचा रमाई प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक दिगंबर हजारे यांनी केले तर प्रस्ताविक धम्मपाल तरटे यांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उषाताई भगवान तरटे, शितल बालाजी होनपारखे, सुमनबाई गंगाधर तरटे व धम्मस्मृती बुद्ध विहार भीमगड यांच्या वतीने हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला या कार्यक्रमास केरूर व केरळ परिसरातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे आभार निळकंठ तरटे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker