ताज्या बातम्यानांदेडबिलोली

किनाळा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीचा बाल कला महोत्सव उत्साहात संपन्न

मनोहर मोरे

किनाळा :- किनाळा तालुका बिलोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त दिनांक १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता गावातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात विविध कला गुणदर्शनाचा विद्यार्थी बाल कला महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या विद्यार्थ्यी कला महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन येथील सरपंच विठ्ठल माने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सूर्यवंशी, उपसरपंच बालाजी पाटील भोसले, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन गोविंदराव पाटील भोसले, पोलीस पाटील राजू पाटील भोसले, व्यंकटराव पाटील शेळगावे, रावसाहेब पाटील मोहिते आदिसह अन्य मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी शाळेच्या बाल विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्लास्टिक मुक्तीचा एकच ध्यास या लघु नाटिकेच्या माध्यमातून प्लास्टिक पिशवी न वापरता कापडी पिशवी वापरायला पाहिजे यासाठी जनजागृती केले तर देवा तुझीच काळजी रे, खंडेराया झाली माझी दैयना, चला जेजुरीला जाऊ, माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होतेय कायली अशा एकापेक्षा एक सरस अशा मराठमोळ्या लावणी बरोबरअनेक लघु नाटिका सादर केले.

मला प्रितीच्या झुल्यात झुलवा, यळकोट यळकोट जय मल्हार या गाण्याने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.या कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले यावेळी शाळेतील बाल विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेले विविध कलागुण सादर करून गावकऱ्यांना मंत्रमुग्ध केले.

या विद्यार्थ्यी कला महोत्सव कार्यक्रमास गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक सूर्यवंशीसर, शाळेतील शिक्षक कोकणे, येळगे, वाघमारे, सौ. गड्डेवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker