ताज्या बातम्यानांदेडनायगांव

मॉर्निंग वॉक ग्रुपच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

भगवान शेवाळे

बरबडा :- नायगाव तालुक्यातील बरबडा–पाटोदा शिवारात असलेल्या इच्छापूर्ती काळा मारुती मंदिर परिसरात मॉर्निंग वॉक ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत भक्तिभावाने व जल्लोषात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात सेवानिवृत्त शिक्षक शिवाजीराव शेवाळे यांच्या संगीतमय वंदनगीताने झाली. गौरव शेवाळे व गौरी शेवाळे या बालकांनी शिवरायांच्या जीवनावर आधारित वंदनगीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी संतोषी खंडू मुंडफळे व तेजस शेटे या विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी भाषणे केली. तर नागोराव गुरुजी तिप्पलवाड यांनी शिवरायांच्या जीवनकार्यावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. यानंतर प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिवरायांना अभिवादन करण्यात आले.

‘जय भवानी, जय शिवराय’च्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.मॉर्निंग वॉक ग्रुपचे अध्यक्ष भगवानराव शेवाळे व सर्व सदस्यांच्या पुढाकारातून या शिवजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले. सकाळी ठीक सहा वाजता सर्व सदस्य उपस्थित राहून शिवरायांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन करण्यात आले व मिठाई वाटप करून शिवजयंती साजरी करण्यात आली.

यावेळी अभिजीत पाटील हंबर्डे, माधवराव धर्माधिकारी, हनमंत पा. शिंदे, खंडू भाऊ मुंडफळे, हरी गुरुजी नागधरे, मारोती बारदेवाड, मारोती मदेवाड (फौजी), संजय लांडगे, गोविंदराव धर्माधिकारी, राजू सोकलवाड, व्हॉईस ऑफ मीडियाचे नायगाव तालुका अध्यक्ष गंगाधर ढवळे, बापुराव बडूरे गुरुजी, साहेबराव पाटील हंबर्डे, संतोष पाटील हंबर्डे, राम पाटील हंबर्डे, प्रशांत देशमुख, पोलीस पाटील चक्रधर देशमुख, लक्ष्मण आनेमवाड, प्रभू मदेवाड, आनंद हुसेकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार गंगाधर ढवळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन खंडू मुंडफळे यांनी मानले. हा शिवजन्मोत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी मॉर्निंग वॉक ग्रुपच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker