ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून अभिवादन…

नांदेड :- रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना आज जयंतीदिनी त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाच्यावतिने त्यांना अभिवादन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम यांच्या मार्गदर्शनातून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी पक्षाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष तातेराव पाटील आलेगांवकर, माजी नगरसेवक प्रकाश मुराळकर, लक्ष्मण भवरे, डॉ.शिवाजी कागडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नाना पोहरे, सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष मारोती चिवळीकर, ओबीसी सेलचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवकुमार देवकते, शहर जिल्हाध्यक्ष गंगाधर महाजन, अमित कांबळे, पांडुरंग गवळे, माणिक बोडके, बाबुराव जोगदंड, सुरेश चंदावार आदींसह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker