खतगावकर महाविद्यालयातील नारायण भुसावळे यांची जाळुन घेऊन आत्महत्या

मोरे मनोहर
किनाळा :- शंकरनगर तालुका बिलोली यज्ञयेथील कै.मधुकर पाटील खतगावकर महाविद्यालयातील कर्मचारी नारायण संभाजी भुसावळे यांनी कौटुंबिक त्रासाला कंटाळून स्वतःच्या घराच्या छतावर अंगावर पेट्रोल ओतून दि.1 फेब्रुवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास जाळुन घेतले. नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना 2 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता दुखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर धुप्पा येथील स्मशानभूमीत सायंकाळी पाच वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मूळ जन्मगाव आदमपूर तालुका बिलोली येथील नारायण संभाजी भुसावळे हे गेल्या 34 वर्षापासून शंकरनगर येथील कै. मधुकरराव पाटील खतगावकर महाविद्यालयात सेवक म्हणून कार्यरत असल्याने ते धुप्पा येथे अनेक वर्षापासून स्थायिक होते. नारायण भुसावळे यांचा एकुलता एक असलेला मुलगा अनिलचे अल्पशा आजाराने वयाच्या 32 व्या वर्षी दुःखद निधन झाले. अनिलच्या निधनापासून अनिलचे सासरे नारायण भुसावळे यांना वारंवार त्रास देत होते. दोनच दिवसांपूर्वी अनिलच्या सासऱ्यांनी नारायण भुसावळ यांच्याशी वाद घालून त्यांच्या मुलीला आणि नातवंडांना नांदेडला नेले. त्यामुळे समाजात माझी बदनामी झाली.
या भावनेतून नारायण भुसावळे यांनी घराच्या छतावर जाऊन अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतले. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात व नंतर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु दि. 2 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. शासकीय रुग्णालयात त्यांचे सेवाविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर शंकर नगर जवळील धुप्पा येथील स्मशानभूमीत सायंकाळी पाच वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या अंत्यविधीस बाळासाहेब पाटील खतगावकर, राजेश पाटील भिलवंडे, प्राचार्य दुर्गाप्रसाद पांडे, मुख्याध्यापक धनंजय शेळके, प्राचार्य शिवाजीराव पाटोदे, डॉ.हेमंत बक्षी, विस्तार अधिकारी मगेश हनवटे, सुधाकर बावणे, बजरंग पाटील, गौतम पवार, डॉ.निळकंठ कांबळे, गौतम कांबळे, मारोतराव वडे, प्रभाकर पेंटे, अवकाश पाटील यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



