नांदेड शहरात 1 लाख 33 हजाराच्या बनावट नोटा सापडल्या : दोन आरोपी अटक
मराठवाडा बनतेय बनावट नोटांचे केंद्रबिंदू

अंकुशकुमार देगावकर
नांदेड : शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील पथकाने शहरातील मगणपुरा भागात 1,33,500 रुपयाच्या बनावट नोटा जप्त केल्या असून. दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या बनावट नोटा बाजारात चालवण्यासाठी छत्रपती संभाजी नगर येथील इसमाने दिल्याचे अटक केलेल्या दोन आरोपींनी सांगितले. त्यामुळे मराठवाडा बनावट नोटाचे केंद्र बनत चालले आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
चार पाच दिवसापूर्वीच देगलूरच्या एका व्यापाऱ्याने नायगाव तालुक्यातील कुंचेली येथील ऐका शेतकऱ्याला बनावट नोटा दिल्याची घटना घडली होती. या प्रकरणी देगलूर पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नाही. देगलूरची घटना ताजी असतानाच नांदेड शहरात 1 लाख 33 हजाराच्या बनावट नोटा सापडल्या आहेत. चार पाच दिवसात बनावट नोटांच्या दोन घटना घडल्याने बाजारात बनावट नोटांचा सुळसुळाट तर झाला ना अशी शंका व्यक्त केल्या जात आहे.
पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथील गुन्हे शोध पथकातील पोलीस उप निरीक्षक मोहम्मद साजीद हुसैन व गुन्हेश शोध पथकातील अंमलदार हे दि. 20 रोजी शिवाजीनगर हद्दीमध्ये अवैध व्यवसाय बाबत कार्यवाही व पेट्रोलींग करत असताना गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहीतीच्या आधारे मगनपुरा नांदेड येथील एम एम होन्डा शोरुमचे बाजुस रोडवर इसम नामे 1) महेश कृष्णाजी तुतारे (पाटील) वय 31 वर्ष व्यवसाय व्यापार रा. मगणपुरा नांदेड 2) सोनुसिंग पि.मुखत्यारसिंग चहाल वय 28 वर्ष व्य गुरुव्दारा सेवादार रा. नगिना घाट नांदेड यांचे ताब्यात बनावट नकली नोटा खरी आहे म्हणुन वापरली जावे आशा उदेशाने ताब्यात बाळगलेले मिळुन आले.
तसेच नमुद आरोपीकडे बनावाट नोटा बाबत विचारपुस केली असता ईसम मसु पांडुरंग शेंडगे वय 50 वर्ष, रा.सिडको महानगर, छत्रपती संभाजीनगर, याचे कडुन बनावट नोटा घेतले असल्याचे सांगीतल्यावरुन नमुद तिन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोन आरोपी कडुन 500 रुपयाच्या 267 नोटा एकुण 1,33,500 रुपये व एक स्कुटी क्र. MH-26- BB-0674 जु.वा.कि.अं.40,000/- रुपये असा एकुण 173,500 रुपये चा मुद्देमाल केला जप्त.
शिवाजीनगर नांदेड यांनी लागलीच एक पथक तयार करुन आरोपी मसु पांडुरंग शेंडगे वय 50 वर्ष, रा. सिडको महानगर, छत्रपती संभाजीनगर यास ताब्यात घेणे कामी रवाना केले. पथकाने नमुद आरोपीस ताब्यात घेवुन सदर गुन्ह्याबाबत विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्याने महेश कृष्णाजी तुतार, सोनुसिंग पि.मुखत्यारसिंग चहाल यांना बनावट नोटा दिल्याचे कबुली दिली आहे.



