कुंडलवाडी शहरात स्मार्ट मीटर मध्ये छेडछाड करून वीज चोरी ◆ चार ग्राहकांविरूद्ध भोकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

कुंडलवाडी :- महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी देगलूर विभागातर्फे सध्या स्मार्ट मीटर तपासणी तसेच अनधिकृत वीज चोरी उघड करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली असून कुंडलवाडी शहरात स्मार्ट मीटर मध्ये छेडछाड कडून वीज चोरी केल्याचा प्रकार उघड झाल्याने चार जणांविरुद्ध भोकर पोलीस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरण कंपनी देगलूर चे वीज चोरी रोखण्यासाठी तयार केलेले पथकाचे पथक प्रमुख उपअभियंता बालाजी पांचाळ यांच्या नेतृत्वात कुंडलवाडी शहरात प्रधान तंत्रज्ञ नागोराव घोरबांड, वरिष्ठ तंत्रज्ञ बलकेवाड, कनिष्ठ अभियंता सुरेश गट्टुवार यांच्या पथकाने शहरात ग्राहकांच्या घरी अचानक तपासणी केली असता अनधिकृत वीज वापर व स्मार्ट मीटर मध्ये छेडछाड केल्याचा प्रकार उघडकीस आल. दि.१६ मार्च रोजी शहरातील अनधिकृत वीज वापर करणाऱ्या एका ग्राहकांची घरी तपासणी केली असता वीज बिल थकल्याने सर्विस वायरला टॅग करून अनधिकृत वीज वापर करताना एका ग्राहकास पकडून वीज चोरीचा गुन्हा भोकर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत सहायक अभियंता साईनाथ भाये, एन.जी.घोरबाड, नरेश अन्नमवाड, कनिष्ठ अभियंता सुरेश गट्टुवार यांच्या पथकाने शहरात स्मार्ट मीटर ची तपासणी केली असता तीन ग्राहकांनी स्मार्ट मीटर मध्ये छेडछाड करून वीज चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला.छेडछाड केलेल्या तीन ग्राहकांविरुद्ध ८९३१० रुपयांची वीज चोरी केल्याने भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



