गावाकडच्या बातम्यानांदेडनायगांव

मांजरम येथे निळकंठराव माली पाटील यांच्याकडून इफ्तार पार्टीचे आयोजन ; हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन

​प्रकाश महिपाळे

नायगाव :- तालुक्यातील मांजरम येथे सामाजिक सलोखा आणि धार्मिक एकात्मतेचे दर्शन घडवत, माजी सरपंच शोभाबाई निळकंठराव माली पाटील व सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी निळकंठराव माली पाटील यांच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी भव्य ‘इफ्तार पार्टी’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून “हिंदू-मुस्लिम भाई-भाई” असा संदेश देण्यात आला.

परंपरेचा वसा आणि सामाजिक सलोखा

​राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींकडून रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टी देण्याची परंपरा आहे. याच परंपरेचा भाग म्हणून रविवारी निळकंठराव माली पाटील यांनी या मेजवानीचे आयोजन केले होते. केवळ मेजवानीच नव्हे, तर यावेळी उपस्थित मुस्लिम बांधवांचा यथोचित सन्मानही करण्यात आला.

​या कार्यक्रमाला परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने बाबाराव पाटील शिंदे, डी.एन. शिंदे, उमाकांत शिंदे, व्यंकटराव केते, शिवाजीराव शिंदे, भास्करराव गायकवाड, हणमंतराव शिंदे. गणपतराव माली पाटील, गंगाधरराव शिंदे, गंगाधर गंडेवाड, राजेश शिंदे, कैलास जांभळे, विश्वाभंर माली पाटील, पंडित शिंदे, गोविंद छेपरे, श्रीकांत माली पाटील, विलास माली पाटील, पदमाकर पांचाळ, खाकु उलगुलवाड, केशव रेजितवाड, बालाजी शिंदे, तिरुपती शिंदे, पांडुरंग माली पाटील, विश्वजित केते, विद्याधर जांभळे, व्यंकट कोंडावर. मौलाना साहेब, जावेद शेख, लतीफ टेलर यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.

​या उपक्रमामुळे गावातील बंधुभाव अधिक दृढ होण्यास मदत झाली असून, निळकंठराव माली पाटील यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker