यमुनाबाई माध्यमिक व ज्युनियर कॉलेज नायगाव या कॉलेज ची बारावी निकालाची 29 वर्षापासून ची यशाची परंपरा या ही वर्षी कायम विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के

New Bharat Times नेटवर्क
नायगाव : यमुनाबाई माध्यमिक व ज्युनियर कॉलेज नायगाव ता.नायगाव जिल्हा नांदेड या कॉलेज मधील बारावी विज्ञान शाखेला एकूण-68 विद्यार्थिनी प्रविष्ठ झाल्या होत्या त्या पैकी-68 उत्तीर्ण झाल्या आहेत.प्रथम श्रेणीत-08 द्वितीय श्रेणीत-52 उत्तीर्ण-68 बारावी विज्ञान शाखेचा निकाल-100 % लागला आहे.बारावी कला शाखेत एकूण-35 विद्यार्थिनी प्रविष्ट झाल्या होत्या त्या पैकी-32 विद्यार्थ्यिनी उत्तीर्ण झाल्या आहेत.प्रथम श्रेणीत-7 द्वितीय श्रेणीत-19 उत्तीर्ण-32 बारावी कला शाखेचा निकाल-91.42 % लागला आहे.
विज्ञान शाखेत गुणानुक्रमे-
1)कु.निकिता पांढरे-70.83%
2)कु.स्नेहल नरवाडे-67.83%
3)कु.महादेवी तोकलवाड-66.17
कला शाखेत गुणानूक्रमे-
1)कु.संजना पांढरे-71.83%
2)कु.वैष्णवी शिंदे-65 %
3)कु.मयुरी गंगुलवार-63.17%
वरील सर्व गुणवंत विद्यार्थिनींचे, पालकांचे व सर्व विषय शिक्षकांचे संस्था अध्यक्ष मा.श्री शिवराज पाटील होटाळकर साहेब, उपाध्यक्ष श्री दत्तात्रय पाटील होटाळकर, सचिव श्रीमती सिंधूताई होटाळकर संचालक श्री भाऊराव(दादा) पाटील होटाळकर, प्राचार्य श्री फाजगे सर यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे. सदर शाळा व कॉलेजचे नायगाव पंचक्रोशीत कौतुक होत आहे.



