नायगाव तालुक्यातील पेट्रोल पंपांवर 24 तास ग्रामपंचायत अधिकारी व तलाठ्यांना नियुक्ती : कृत्रिम टंचाई रोखण्यासाठी तहसीलदारांचे आदेश

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : जिल्ह्यात निर्माण झालेल्या कृत्रिम टंचाईच्या पार्श्वभूमीवर नायगाव तहसील कार्यालयाने मोठा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व अत्यावश्यक सेवांना इंधनाचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी तालुक्यातील 14 पेट्रोल पंपांवर 24 तास ग्रामपंचायत अधिकारी व तलाठ्यांना नियुक्ती करण्यात आले आहे.
तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी काढलेल्या आदेशानुसार, जिल्हाधिकारी नांदेड यांच्या निर्देशानुसार ही उपाययोजना करण्यात आली आहे. पेट्रोल पंपांवर गर्दी नियंत्रण, काळाबाजार, कृत्रिम टंचाई व साठेबाजी रोखण्यासाठी प्रत्येक पंपावर दोन शिफ्टमध्ये अधिकारी राहणार आहेत. सकाळी 8 ते रात्री 8 आणि रात्री 8 ते सकाळी 8 अशा दोन शिफ्ट असणार आहेत. सकाळी 8 ते 6 या वेळेचा अहवाल तहसील कार्यालयात दररोज सादर करणे बंधनका असून. प्रारंभिक साठा, दिवसभरातील विक्री, अखेरचा शिल्लक साठा व राखीव साठा यांचा अहवाल ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
ॲम्ब्युलन्स, अग्निशमन दल, पाणीपुरवठा व शासकीय वाहनांना प्राधान्याने इंधन पुरवठा. कॅन, ड्रम, बॅरलमध्ये इंधन देण्यास मनाई, पंपावर शिल्लक साठ्याचा फलक दर्शनी भागात लावणे. साठा नोंदवही, स्टॉक रजिस्टर व भूमिगत टाकीतील प्रत्यक्ष साठा तपासणे. पंपावर होणारी गर्दी नियंत्रणात ठेवणे, रांगा लावणे. दररोज सायंकाळी 5 वाजता तहसील कार्यालयात सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
कोणत्या पंपावर कोण?
1. *इंद्रपुरी पेट्रोल पंप देगाव* – सुरेश हनमंते, पवन कदम, अशोक कदम, यशोदा तोरकट
2. कुसुम पेट्रोल पंप नायगाव – हेमंत येसेकर, दिलीप मदेवाड, केशव आनदा पवळे, निरंजन पुरी, मिलिंद जोंधळे, बालाजी आलेवाड
3. माऊली पेट्रोल पंप नायगाव – शरद देवकांबळे, बाबु ढोकेवाड, अंकुश मोरे, संतोष सुर्वे
4. गुडगिला पेट्रोल पंप नरसी – पी.पी. मोरे, परमेश्वर कोलकर, श्रीनिवास सोंगवार, रमेश पवळे, दिलीप चौधरी, मधुकर जाधव
5. जयंती प्रभाकर पेट्रोलियम नरसी – शाम मुंडे, शिल्पा वाघमारे, शेख रफिक, कामाजी गायकवाड, गजानन इबिते, भागवत भुताळे
6. माणिक प्रभू पेट्रोलियम देगाव – एस.टी. मंगनाळे, संदिप पवार, तुकाराम राठोडकर, मिरा मोरे, मोहन अडकिणे, सुनिता राजपल्ले
7. साईराज पेट्रोलियम देगाव – सुमित्रा मेंकलवार, पुष्पकर दत्तात्रय, राजेश्वर सोनटक्के, सुप्रिया मराठा, देशमुख श्रीकांत
8. आकाश पेट्रोलियम तळबिड – वि.एस.भुयटे, शुभम पाटील, वसंत पुसुड, संच्या शिवराज, सचिन कपसे, पुरजार संतोष
9. साई पेट्रोलियम देगाव – जी.एस. काळे, कानोले एस.एम, माणिक श्रीरामे, शिवकांत कहाळेकर, रामेश्वर मुदखेडे, पंजाब जाधव
10. तुळजा भवानी पेट्रोलियम कृष्णूर – एन.व्ही.अनवाड, सुनिल हायसपल्ले, अर्जुन पवारे, चक्रधर देशमुख, दिलीप खैरनार, गणेश कदम
11. नायरा पेट्रोल पंप कृष्णूर – जयंत तुडमे, अनिता खंडे, शिंदे हणमंत, श्रीनिवास जाधव, शेख मुर्तुजा, राजेश तुडटवाड
12. अनिकेत पेट्रोलियम कृष्णूर – जी.एस. देशमुख, पूजा भालेराव, सुर्यकांत कदम, राजु मदेवाड
13. तुळजा भवानी पेट्रोलियम गडगा – जी.एन. चव्हाण, प्रतिमा महाजन, विनोद झुंजुरे, संजय भांगे, विजयकुमार कोदावार, नागोराव जाधव
14. महादेव पेट्रोलियम गडगा – चंद्रभान कदम, व्यंकोबराव मोरे, रमेश जेठेवाड, कपिल लोखंडे, दत्ता वाघमारे, अतुल पवार. सदरच्या नियुक्त्या ह्या दि. 27 मे ते 1 जुन या कालावधीसाठीच आहेत.
सदरचे आदेश काढताना पंचायत समितीने तहसील कार्यालयाला चुकीची माहिती दिली असून यात एका सेवानिवृत्त आणि बदली झालेल्या ग्रामसेवकाचाही समावेश आहे.



