जीएसटी कपातीमुळे थेट ग्राहकांचा फायदा झाला ◆ आमदार जितेश अंतापुरकर यांचे प्रतिपादन
◆कुंडलवाडी येथे भाजपा उद्योग आघाडी जिल्हा संयोजक सुनील बेजगमवार व व्यापारी आघाडीचे सहसंयोजक दिनेश दाचावार यांच्याकडून जीएसटी सुधार संवाद सत्राचे आयोजन

कुंडलवाडी :- जीएसटी कमी झाल्यामुळे जनतेची बचत वाढेल आणि विविध प्रकारच्या वस्तू ते सहज खरेदी करू शकतील. गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, युवावर्ग, उद्योजक, महिला अशा सर्व घटकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. असे प्रतिपादन देगलूर- बिलोली विधानसभेचे आ.जितेश अंतापूरकर यांनी कुंडलवाडी येथे दि.११ ऑक्टोबर रोजी भाजपा जिल्हा उद्योग आघाडी व व्यापारी आघाडी च्या वतीने आयोजित जीएसटी सुधार संवाद सत्रात केले.

आत्मनिर्भर भारत, जीएसटी, नेक्स्ट जनरेशन दोन या विषयावर कुंडलवाडी शहरात भाजपा जिल्हा उद्योग आघाडीचे संयोजक सुनील बेजगमवार व भाजपा व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश दाचावार यांच्या वतीने दि.११ आँक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता येथील सोसायटीच्या कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित शहरातील व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आ.जितेश अंतापुरकर बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस माजी आमदार जयरामजी अंबेकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून भाजपा जिल्हा सरचिटणीस माणिकराव लोहगावे, भाजपा जिल्हा सरचिटणीस डॉ.माधवराव पाटील उच्चेकर व भाजपा जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण ठक्करवाड, उद्योजक साईनाथ उत्तरवार यांनी जीएसटी कपाती मुळे ग्राहकांना कसा फायदा होत आहे. यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी सुनील बेजगमवार प्रास्ताविक करताना म्हणाले की, उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्याकडे दिल्याने भारतीय जनता पक्षाचे मी आभार मानतो. आगामी काळात जिल्हाभरात नवतरुणांना आत्मनिर्भर भरण्यासाठी प्रयत्न करून या पदाचा सर्वसामान्य जनतेला व तरुण वर्गाला उद्योगांमध्ये उभे राहून यशस्वी होण्यासाठी मदत करणार असल्याची प्रतिपादन सुनील बेजगमवार यांनी यावेळी केले.
यावेळी आ.जितेश अंतापुरकर यांच्या हस्ते भाजपा उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याने सुनील बेजगमवार, व्यापारी आघाडी उपाध्यक्ष दिनेश दाचावार व उद्योगा आघाडी सहसंयोजक पदी विजय कुंचनवार यांची निवड झाल्यामुळे त्यांचा शाल, श्रीफळ पुष्पहाराने सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती भाजपा व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार मडगूलवार, कुंडलवाडी शहरातील प्रसिद्ध व्यापारी पंढरीनाथ दाचावार, उद्योजक साईनाथ उत्तरवार, मंडळ अध्यक्ष हणमलू इरलावार, भाजपा उद्योग आघाडी सहसंयोजक विजय कुंचनवार, माजी उपनगराध्यक्ष शैलेश -याकावार, भाजपा बिलोली मंडळ अध्यक्ष मारुती राहिरे यांच्यासह कुंडलवाडी शहरातील व्यापारी, ग्राहक, नागरिक, पत्रकार आदी जण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा उद्योग आघाडीचे जिल्हा संयोजक सुनील बेजगमवार यांनी केले. जीएसटी कमी झाल्यामुळे ग्राहकांची खरेदी वाढून व्यापारी व ग्राहकांचे हित जोपासले गेल्याचा सूर या संवाद सत्रात उमटला.



