ताज्या बातम्यानांदेडनायगांव

हाके यांच्या गाडीवर हल्ला केल्या प्रकरणी 10 लोकांच्या विरोधात गुन्हा नोंद

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : लोहा मतदारसंघातील जनहित पक्षाचे उमेदवार चंद्रसेन पाटील त्यांच्या प्रचारासाठी आलेल्या ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी आंदोलन करणा-या लक्ष्मण हाके यांची गाडी फोडण्यात आल्याची घटना गुरुवार दि. ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी आंदोलकांनी पोलीसाशी हुज्जत घालून जखमी केले आणि शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी 10 लोकांच्या विरोधात गुन्हा नोंद करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.

कंधार तालुक्यातील बाचोटी गावात पोलीस अधिकारी व अमलदार मुख्य चौकात पोहचला असता त्या ठिकांणी 30 ते 40 लोकांचा जमाव रोडच्या कडेला दिसुन आला त्यापैकी 03 ते 04 लोकांच्या हातात काळे झेंडे होते तेव्हा पोलीस अधिकारी व अमलदार यांनी सदर लोकांना सध्या आदर्श आचारसंहीता व मा.जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांचे जमावबंदीचे आदेश लागु आहेत आपण येथुन निघुन जा असे वारंवार आदेशीत केले असतांनाही त्यांनी पोलीसांचे आदेश न जुमानता तेथेच थांबुन उमेदवार चंद्रसेन पाटील व प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचे प्रचार दौऱ्याची वाहणे 20.20 वा आली असता आंदोलकांनी वाहणाजवळ जावुन एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या

प्राध्यापक हाके हे थोड पुढे जावुन ओबिसी समाजाचा सत्कार स्विकारत असतांना आंदोलकापैकी कोणीतरी गाडीचे काचेस दगड मारुन नुकसान केले. पोलीसांनी आंदोलकांना वेळीच पांगवुन उमेदवार चंद्रसेन पाटील यांचे वाहणास सभास्थळी रवाना केले.

यातील आंदोलकांना पांगापांग करतांना आंदोलकांनी पोलीसांशी हुज्जत घालुन जोरजोरात घोषणाबाजी करुन पोलीस अमलदार पोहेकों/सानप यांना जखमी करुन शासकिय कामात अडथळा निर्माण केला आहे. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करुन यातील 10 आरोपीतांना अटक केली असुन पुढील तपास चालु असल्याचे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker