मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची साईड सुरळीत चालू नसल्याने बहिणीत चिंता वाढली

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची साईड दि.१ ऑगस्ट पासून सुरळीत चालत नसल्याने यानत्या कारणाने मागे पडलेल्या बहिणीचा अर्ज स्वीकारीत नसल्याने खेड्या पाड्यातील बहिणीने मल्टीसर्वीसच्या सेंटर येथे प्रचंड गर्दी करून आधार संबधिच्या दुरूस्त्या करून घेण्याची धावपळ सुरू केली आहे.गेल्या दहा दिवसांपासून साईड सुरू नसल्याने बाहिणीत चिंतेचे वातावरण आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज सहज सुलभ भरता यावे यासाठी स्थानिक प्रशासन अधिकारी लोकप्रतिनिधी यांनी या संदर्भातील अडचणी समस्या सहज सोडून आप आपल्या गावात मोबाईल, अंगणवाडी कर्मचारी, ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने अर्ज भरून घेतले तसेच ३१ ऑगस्ट शेवटची तारीख घोषित केली आहे. तरी आज गेल्या दहा दिवसांपासून अद्याप साईट सुरू नसल्याने बाहिणी मध्ये चिंतेचे वातावरण आहे.
बहिणीने बॅंक खाते, आधार कार्ड अपडेट करणे, रेशनकार्ड नसने, उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी विलंब झाले या मुळे योजनेचे लाभार्थी होण्यासाठी कागज पत्राची पुर्णतः करावी लागली. ते कागद पत्रे पुर्ण झाल्यावर साईड सुरळीत चालत नसल्याने या कामात काही अडचणी दाखविल्या जात आहेत.
आधारला मोबाईल नंबर लिंक करा, ओटीपी येतच नाही, आली तरी स्वीकारीत नाही अश्या अडचणी निर्माण झाल्या आहेत या सर्व गैरसोयी मुळे मागे राहिलेल्या लाभार्थ्यांची लुट होण्याची शक्यता आहे. सरळ सरळ साईड व्यवस्थीत करून मागे राहिलेल्या लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेऊन योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी महिला वर्ग कडून केली जात आहे.
विधान प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून वेळेत मिळत नसल्याने असंख्य लाडक्या बहीणींना रहीवासी सह उत्पनाचे प्रमाणपत्र पंधरा पंधरा दिवस मिळत नाहीत. यातच प्रमाणपत्राची जबाबदारी ज्या नायब तहसीलदारावर होती ते रजेवर गेले असल्याने प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया ठप्प झाली आहे.