ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

डॉ.शंकररावजी चव्हाण विकास पत्रकारिता पुरस्कार न्युज 18 लोकमतच्या प्रियंका लाठी तर कै.सुधाकरराव डोईफोडे प्रेरणादायी पत्रकारिता पुरस्कार निलेश सोमानी यांना जाहीर

स्व.रामेश्वर बियाणी जीवन गौरव पुरस्काराने जगदीश जोगदंड होणार सन्मानित

New Bharat Times नेटवर्क

नांदेड : – दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त देण्यात येणारे डॉ. शंकररावजी चव्हाण विकास पत्रकारिता पुरस्कार मुंबई न्युज 18 लोकमतच्या प्रियंका लाठी तर कै. सुधाकरराव डोईफोडे प्रेरणादायी पत्रकारिता पुरस्कार वाशीमचे निलेश सोमानी यांना जाहीर झाला असून स्व. रामेश्वर बियाणी जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार पूर्णा येथील ज्येष्ठ पत्रकार जगदीश जोगदंड यांसह वृत्तपत्र क्षेत्रातील मान्यवरांचा दि. 5 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी सहा वाजता मिनी सह्याद्री सभागृह नांदेड येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मान होणार असल्याची माहिती मुख्य संयोजक तथा मुख्य संपादक रुपेश पाडमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

मीमांसा फाउंडेशन, दै.समीक्षा, मंथन क्रिएटिव्ह ग्रुप, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, पत्रकार प्रेस परिषदेच्यावतीने दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत मान्यवरांचा त्यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे व त्यांना अधिक प्रेरणा मिळावी म्हणून विविध पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. यंदाचे हे 18 वर्ष आहे. यात मागील अनेक वर्षापासून विविध चॅनलमध्ये सेवा देणार्‍या मुंबई न्युज 18 लोकमतच्या निवेदिका प्रियंका लाठी यांना डॉ.शंकररावजी चव्हाण विकास पत्रकारिता पुरस्कार.

शैक्षणिक सहभागासह वृत्तपत्र क्षेत्रात योगदान देणारे दैनिक सकाळ पूर्णा येथील प्रतिनिधी जगदीश जोगदंड यांना स्व.रामेश्वर बियाणी जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार, दैनिक मातृभूमीचे निवासी संपादक म्हणून कार्यरत असणारे वाशिमचे निलेश सोमाणी यांना कै. सुधाकरराव डोईफोडे प्रेरणादायी पुरस्कार, सातत्याने लिखाण करणारे माहूरचे ज्येष्ठ पत्रकार वसंत कपाटे यांना दैनिक समीक्षा कर्तुत्व सन्मान, सन 1996 पासून वृत्तपत्रात कार्यरत व विविध पुरस्कार प्राप्त आखाडा बाळापूर येथील दै.लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार रमेश कदम यांना स्व.अनिल कोकीळ स्मृती पुरस्कार.

मागील अनेक वर्षापासून जिल्हा परिषदेच्या सकारात्मक बातम्या देऊन प्रशासनाची शान वाढवण्यासाठी परिश्रम घेणारे मिलिंद व्यवहारे यांना भीमाचा फाउंडेशन ह्यूमन राइट्स वर्कर पुरस्कार, सुट्टी लेखन करत वाढत्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणारे नायगाव येथील सकाळचे बातमीदार प्रभाकर लखपत्रेवार यांना पंचनामा कार लक्ष्मण गायकवाड निर्भीड पत्रकारिता पुरस्कार, चळवळीसह अनेक लढ्यात भाग घेऊन वंचितांना न्याय देण्यासाठी लेखणीतून आवाज उठवणारे परभणी शिल्पकार चे संपादक भूषण मोरे यांना स्वर्गीय माधव अंबुलगेकर युवा पत्रकारिता पुरस्कार.

सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करणारे आपली बिलोली नगरीचे संपादक सय्यद रियाज अब्दुल यांना मंथन क्रिएटिव्ह सोशल मीडिया पुरस्कार, मुखेड तालुक्यातील जांब येथे मागील अनेक वर्षापासून वृत्तपत्र विक्रेता म्हणून सेवा देणारे ज्ञानोबा कानगुले यांना स्व.अनंतराव नागापूरकर वृत्तपत्र विक्रेता पुरस्कार, शहरी भागात वृत्तपत्र विक्रीतून अहोरात्र परिश्रम घेणारे नांदेडचे ज्ञानोबा नरवाडे यांना स्व. प्रमोद योगी वृत्तपत्र विक्रेता पुरस्कार, लेखणीच्या माध्यमातून समाजसेवा करत वृत्तपत्राचा मुख्य कणा असणार्‍या जाहिरातीतूनही आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे देगलूरचे पुण्यनगरीचे प्रतिनिधी नरहरी कोलगणे यांना वृत्तपत्र क्षेत्रातील जाहिरात आधारस्तंभ पुरस्कार.

छायाचित्रातून बातमी सांगून वेगवेगळ्या माध्यमातून सेवा देणारे किनवट येथील कचरू जोशी यांना वृत्तपत्र क्षेत्रातील तिसरा डोळा फोटोग्राफर पुरस्कार, मागील 40 वर्षांपेक्षाही अधिक काळापासून वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून संगणक चालक म्हणून काम करत आपल्या कार्यातून ठसा उमटवणारे सत्यप्रभा येथे कार्यरत मधुकर वाघोळे यांना वृत्तपत्र क्षेत्रातील सहकारी दुवा संगणक चालक पुरस्कार.

मागील अनेक वर्षापासून मुद्रण संघासह पद्मशाली युवक संघटनेत कार्यरत राहून मुद्रण क्षेत्रात सेवा देणारे नांदेड एकजुटी शहर प्रतिनिधी भारत गट्टेवार यांना स्व.सुरेश पटणे मुद्रण सेवा पुरस्कार, वृत्तपत्र क्षेत्रात तळमळीने लिखाण करून अन्यायाविरोधात आवाज उठवत आपल्या कार्याचा ठसा उमटवणारी मुखेड येथील लोकमतचे प्रतिनिधी शेखर पाटील यांना स्व.गोपाळ देशपांडे कुशल पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

सदरील सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंथन क्रिएटिव्ह ग्रुपचे रामेश्वर धुमाळ, प्रदेश प्रभारी अरविंद जाधव, मराठवाडा अध्यक्ष सखाराम कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्ष दत्ताजी मोहिते, सहसंपादक ज्ञानेश्वर पवार, सौ.सविता गबाळे, श्रीमती.उषा हाडोळतीकर, सौ.अरुणा पुरी, शिवहरी गाढे, आयुब पठाण तथा मुख्य संपादक व संयोजक रुपेश पाडमुख यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker