शंकरनगर येथे प्रादेशिक परिवहनच्या पाच इंटरसेप्टर वाहनांमधून रस्ता सुरक्षेचे प्रबोधन

मोरे मनोहर
किनाळा :- नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेडच्या वतीने नवीन पाच इंटरसेप्टर वाहनांमधून रस्ता सुरक्षा प्रबोधन पर ध्वनिफीत लावून नांदेड देगलूर राज्य महामार्गावर शंकरनगर तालुका बिलोली येथे मुख्य मार्गाने काढण्यात आलेल्या या रॅलीच्या नवीन पाच इंटरसेप्टर वाहनाद्वारे दोन्ही पीक लावून ही रॅली काढून होणारे अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षेचे प्रबोधन करण्यात आले.
नांदेड जिल्ह्यातील दळणवळणाचा विचार करता रस्त्याद्वारे होणाऱ्या वाहतुकीमध्ये कमालयाची वाढ झाली असून नांदेड जिल्ह्यात दरवर्षी साडेतीनशे ते चारशे नागरिक रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडतात यामध्ये प्रामुख्याने वाहतूक नियमाचे पालन केले जात नसल्यामुळे अशा अपघातात नाहक कुटुंबातील व्यक्तींचा बळी जातो हे कुठेतरी थांबले पाहिजे हा दूरदृष्टीकोण डोळ्यासमोर ठेवून प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षा योजना राबवत असताना वाहतुकी संबंधी असलेले नियम सर्व वाहनधारकांनी पाळणे गरजेचे आहे.
हायवे मार्गावरून वाहन चालवताना हेल्मेट व सीटबॉल चा वापर न करणे, दारू पिऊन वाहन चालविणे, वेगाच्या मर्यादेचे उल्लंघन करणे इत्यादी कारणे दिसून येतात प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड यांच्याकडून जिल्यासाठी नवीन पाच इंटर सेक्टर वाहन दाखल झालेले असून एकूण इंटरसेक्टर वाहनांची संख्या सात झालेली आहे वाहनांमध्ये वेग मर्यादाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी टिंट मोटर अत्याधुनिक उपकरणे बसवण्यात आलेले आहेत.
सदरील कारवाही प्रत्येक तालुक्यात करण्यात येणार असून जिल्ह्यातील नागरिकांनी वाहन चालवताना रस्ता स्वातुकीच्या नियमाचे व मोटार वाहन कायद्याचे काटेकोरपणे पालन करावे आपले मान सुरक्षित ठेवावे तसेच वाहनाचे कागदपत्रे उदाहरणात विमा प्रमाणपत्र पीयूसी योग्यता प्रमाणपत्र कर पावती इत्यादी यादीत ठेवावेत नियमाचे वर्णन करणाऱ्या वाहनधारकावर चालकावर मोटार वाहन कायदा अंतर्गत कारवाई करण्यात येईल तरी नांदेड जिल्ह्यातील सर्व वाहनधारक चालक यांना चालक यांनी याची नोंद घेऊन परिवहन विभागास सहकार्य करावे असे आव्हान प्रादेशिक अधिकारी यांच्यावतीने आयोजित करण्यात आले.
या अपघात टाळा रस्ता सुरक्षेचे नियम पाळा यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीत शंकरनगर येथे वाहतूक नियमाचे प्रबोधन करण्यात आले. याप्रसंगी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.