ताज्या बातम्यानांदेडनायगांव

केरुर जवळ आयचर टेम्पो मोटारसायकलच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू

मनोहर मोरे

नायगाव :- नांदेड देगलुर राज्य महामार्गावर असलेल्या केरुर जवळ आयचर टेम्पो आणि मोटरसायकलची समोरासमोर जोराचे धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात कुंडलवाडी तालुका बिलोली येथील मोटार सायकल्सवर आकाश शंकरराव कदम वय वर्ष 24 हा तरुण जागीच ठार झाला.

सविस्तर माहिती अशी की कुंडलवाडी तालुका बिलोली येथील आकाश शंकरराव कदम हा अटकळी तालुका बिलोली येथे असलेल्या पाहुण्यांना भेटुन केरुर तालुका बिलोली येथे असलेल्या बहीणीकडे दि.२१ मे रोजी सायंकाळी सातच्या सुमारास मोटारसायकल वरून जात असताना तो केरुर जवळ आला असता नांदेड कडून देगलूर कडे भरधाव वेगात येनार्या आयचर टेम्पो क्र.आर.जे. 20 जि.सी.3746 ची मोटारसायकलला समोरासमोर जोराची धडक दिल्याने झालेल्या या भिषण अपघातात कुंडलवाडी तालुका बिलोली येथील आकाश शंकरराव कदम हा तरुण जागीच ठार झाला.

मात्र या भिषण अपघातानंतर आयचर टेम्पो चालकांनी घटनास्थळावरून देगलुर कडे टेम्पोसह पळून जाण्यात यशस्वी झाला परंतु हा अपघात नांदेड देगलूर राज्य महामार्गावर झालेला असल्याने सदरील अपघाताची माहिती रामतीर्थ पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदरील घटनेचा रीतसर पंचनामा केले.

सदरील तरुणाचे नायगाव येथील शासकीय रुग्णालयात शवइच्छेदन करून त्यांचा कुंडलवाडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला असून या प्रकरणी मयताचा मेहुना शिवकुमार रामराव पांडे राहणार केरूर यांनी रामतीर्थ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित आयचर टेम्पोच्या चालकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुरन 116/24 कलम 279, 338, 304 अ भादवि प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरवाडे हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker