ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

उमरी शहरात सहा कोटीच्या स्ट्रीट लाईटचा उजेड पडला नसताना पुन्हा सव्वा कोटीच्या सोलार लाईट खरेदी करण्याचा घाट

अंकुशकुमार देगावकर

उमरी : उमरी नगर पालिकेच्या कारभाऱ्यांनी 6 कोटीच्या स्ट्रीट लाईटच्या कामाचे तीनतेरा वाजवल्यानंतर आता पुन्हा शहरातील 6 प्रभागात लिथियम बँटरीसह सोलार स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मार्च महिण्यात 1 कोटी 26 लाखाच्या निविदा काढल्या आहेत. पुर्वीच्याच 6 कोटीच्या योजनेचा शहरात अद्याप उजेड पडलेला नसता ही नवीन योजनेचा कुणाच्या घरात उजेड पडणार आहे याची कुजबूज उमरी शहरात सुरु झाली आहे.

मागील दोन वर्षापासून उमरी नगर पालिकेत प्रशासकराज आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांचाच कारभार चालतो. पण मुख्याधिकारी निलम कांबळे यांच्यावर उमरी शहराच्या विकासाची जबाबदारी असतांना त्या अभियंता संतोष मुंढे व राजकीय वरदहस्त प्राप्त एका गुतेदाराच्या संगणमताने शासकीय निधी घशात घालण्याचे काम करत आहेत. गोरठेकर परिवाराने नगर पालिकेचा कारभार चालवताना शहरातील गोरगरिबांना नजरेसमोर ठेवून कारभार केला पण आता गोरगरिबांच्या योजनाच गायब करण्याचा उद्योग सुरु आहे.

सामाजिक कार्यकर्ते संतोष गुंडाळे यांच्या तक्रारीनंतर आणि न्यु भारत टाईम्स च्या बातमीच्या दणक्याने उमरी नगर पालिकेतील भ्रष्टाचाराची आता गावभर चर्चा सुरू झाली आहे. आणि अनेकजन उमरी पालिकेतील कारभाऱ्यांनी केलेल्या कारनाम्याचे पुरावे देण्यासही सुरुवात केली आहे. शहरात मागच्या वर्षी शहरातील 8 प्रभागात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून तब्बल 6 कोटी मंजूर झाले. त्याच्या कामालाही सुरुवात झाली पण गुत्तेदारांच्या संगनमताने कामाचे तिनतेरा वाजवण्यात येत आहे.

अंदाजपत्रकातील तरतुदी गुंडाळून काम करण्यात येत असताना यंदा दि. 15 मार्च रोजी शहरातील प्रभाग क्रमांक 1,2,3,4,7 आणि 8 मध्ये लिथियम बँटरीसह सह सोलार स्ट्रिट लाईट बसवण्यासाठी 1 कोटी 26 लाखाच्या निविदा काढण्यात आल्या.

यापुर्वी काही प्रभागात लाखो रुपये खर्चून सोलार स्ट्रिट लाईट बसवण्यात आल्या होत्या त्याची देखभाल दुरुस्ती अभावी झालेली अवस्था पाहता तब्बल सव्वा कोटी रुपयाचे सोलार स्ट्रीटच्या निविदा कुणाचा फायदा करण्यासाठी काढण्यात आल्या आहेत याची उमरी शहरात नव्याने चर्चा सुरु झाली आहे. प्रशासक राजमध्ये मुख्याधिकारी निलम कांबळे व गुतेदाराच्या अभद्र युतीने उमरी शहराच्या विकास निधीवर ताव मारण्याची मोहीम तर आखले नाहीत ना अशी शंका नागरिक घेत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker