ताज्या बातम्यानांदेडनायगांव

नांदेड जिल्ह्यातील पहिले वाहन चार्जिंग सेंटर नरसीत

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : जिल्ह्यात इलेक्ट्रीकल वाहणांची संख्या वाढत असून. वाढती संख्या पाहता चार्जिंग करण्याचाही प्रश्न निर्माण होत आहे. काळाची गरज ओळखून युवा उद्योजक प्रकाश दादा भिलवंडे यांनी नरसी सारख्या ग्रामीण भागात चार्जिंग सेंटर उभारले आहे. हे चार्जिंग सेंटर हे जिल्ह्यातील पहीलेच सेंटर ठरले आहे.

खनिज तेलावरचे औलंबित्व कमी करण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार पेट्रोल डिझेल ला पर्याय शोधत होते. त्यामुळे सिएनजी व चार्जिंग वाहणे बाजारात आली. या दोन्ही प्रकारातल्या वाहणांची मागणी वाढल्याने त्यांच्या सिएनजीचा व चार्जिंगचा प्रश्न निर्माण होवू लागला. त्यामुळे नांदेड देगलूर मार्गावरील पेट्रोल पंपावर हळूहळू सिएनजी पंप उभारण्यात येत आहे पण जिल्ह्यात कुठेही चार चाकी किंवा दुचाकी साठी चार्जिंग सेंटर उभारण्यात आले नाही. आज परिस्थितीत ग्रामीण भागात चार्जिंगवरच्या दुचाकी व चार चाकी वाहणांची भरमसाठ संख्या वाढली आहे. परिणामी या वाहणांच्या चार्जिंगचाही प्रश्न निर्माण होवू लागला.

चार्जिंगच्या वाहणाची रेंज ही प्रत्येक कंपनी वेगवेगळी ठरवत असल्याने दुरच्या प्रवासाला जाणे जिकीरीचे वाटत होते. हैदराबाद वरुन निघालेले वाहण नांदेडपर्यत पोहचेल की नाही याची खात्री नव्हती त्यामुळे नरसी येथे चार्जिंग सेंटर झाल्यास वाहण धारकांची सोय होईल हा विचार डोक्यात ठेवून नरसीत चार्जिंग सेटर उभारले. युवा उद्योजक असलेले प्रकाश दादा भिलवंडे हे हरहुन्नरी व्यक्तीमत्व असून ते नेहमीच नवीन संकल्पना अमलात आणण्यासाठी वेगळे काहीतरी करण्याचा प्रयत्न असतो. हे चार्जिंग सेंटर हे नवीन संकल्पनेचाच भाग आहे. आपण निघालेल्या वाटेने चार्जिंग पांईट आहे का हे पाहण्याचे संकेतस्थळ विकसित करण्यात आले असल्याने हैदराबाद वरुन नांदेडला जातांना चार्जिंग संपल्यास काय हा प्रश्नच राहीला नाही.

नरसी येथील चार्जिंग पांईटवर अतिशय कमी वेळात चार्जिंग करण्यासाठी ६० किलो व्हटची मशीन बसवण्यात आली असून केवळ १ रुपयात एक किलोमीटर वाहण धावते. चार्जिंगाठी आलेल्या वाहणधारकास कंटाळा येवू नये यासाठी सेंटरच्या बाजूलाच मनोंरंजन पार्क करण्याचा त्यांचा संकल्प आहे. नांदेड हैद्राबाद महामार्गावर झालेले हे चार्जिंग पाईट जिल्ह्यातील पहीलेच आहे.

मि दोन वर्षांपूर्वी एका कंपणीची ईलेक्ट्रीकल कार घेतली होती. पण नंतर चार्जिंग करण्याची अडचण वाढू लागली. त्यामुळे आज शेकडो वाहणे बाजारात आली त्यांची काय अवस्था असले हे लक्षात आले. त्यामुळे चार्जिंगच्या वाहणधारकांची गैरसोय कमी व्हावी हा विचार करुन हे चार्जिंग पाईंट उभारण्यात आले.

प्रकाश दादा भिलवंडे, नरसी ता. नायगाव.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker