ताज्या बातम्यानांदेडनायगांव

छावा संघटनेच्या वतीने मराठा आरक्षण व शेतकरी आत्महत्या केलेल्या बांधवानच्या घरी रक्षाबंधन साजरा

New Bharat Times नेटवर्क

नायगाव :- सामाजिक वारसा असलेली अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने नायगाव तालुक्यातील भोपाळा, गडगा, केदारवडगाव, टाकळी, बळेगाव येथील मराठा आरक्षणासाठी व शेतकरी आत्महत्या केलेल्या बांधवांच्या घरी जाऊन सामाजिक बांधिलकी कायम असावी ही बाब लक्ष्यात ठेऊन हा उपक्रम छावा संघटनेच्या वतीने राबवण्यात आला.

यावेळी छावाचे जिल्हा अध्यक्ष माधवराव ताटे पाटील, तालुका अध्यक्ष प्रताप पाटील सोमठाणकर, मराठा राष्ट्रीय महासंघ जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील होटाळकर, संभाजी ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष बालाजी देशमुख, साई पाटील मोकासदरेकर, सुदर्शन गाढे, केशव हंबर्डे, दिलीप हंबर्डे, शहाजी जाधव, बालाजी कुदळे, साईनाथ कदम, माधव भंडरवाड, सोपान पाटील उमरेकर, असंख्य छावाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे नियोजन छावाचे संपर्क प्रमुख साई पाटील देगावकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker