ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

भाजप प्रवक्ते पिंटू महादेव यांना अटक करा – काँग्रेस शिष्टमंडळाचे निवेदन

New Bharat Times नेटवर्क

नांदेड : – लोकसभा विरोधी पक्षनेते खा. राहूल गांधी यांना गोळ्या घालून मारण्याचे व्यक्तव्य केरळ येथील भाजपचे प्रवक्ते पिंटू महादेव यांनी केले आहे. लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्यांबदल येवढे मोठे व्यक्तव्य करणे निषेधार्थ आहे. त्यांना तात्काळ अटक करून कार्यवाही करावी अशी मागणी खा.रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात व उत्तर जिल्हाध्यक्ष राजेश पावडे व महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.

केरळ येथील भाजपचे प्रवक्ते पिंटू महादेव यांनी लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्यांबदल येवढे मोठे व्यक्तव्य करणे निषेधार्थ आहे. त्यामुळे त्यांना तातडीने अटक करावे अन्यथा काँग्रेस आंदोलनात्मक पावित्रा घेईल असे खा. रवींद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

निवेदन देतेवेळी खा.रवींद्र चव्हाण, उत्तर जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार, सुरेंद्र घोडसकर, मसुद खान, शेर अली, अब्दुल गफार, रहिम खान, महेश देशमुख तरोडेकर, अजिज कुरेशी, मुन्ना अब्बास, निरंजन पावडे, श्रीनिवास मोरे, सतिश देशमुख तरोडेकर, सुरेश हटकर, सत्यपाल सावंत, डॉ.करुणा जमदाडे, बापूसाहेब पाटील.

माधव पवळे, अतुल पेदेवाड, शंकर शिंदे, दिपकसिंग हुजुरिया, अंबादास रातोळे, गगन यादव, महेश मगर, संजय वाघमारे, इंजि.नसिम पठाण, ज्योती कदम, अनिल कांबळे, प्रसेनजित वाघमारे, सुरेखा वैद्य, नागराज सुलगेकर, गोविंद पाटील, सिमाँन नागोरे, धनंजय उमरेकर, गौतम सिरसाट, ऋषी देशमुख, प्रकाश दिपके आदीसह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker