उमरीताज्या बातम्यानांदेड

मारोतराव कवळे यांनी आत्महत्याग्रस्त कुटूंबीयांची भेट घेताच आमदार राजेश पवारांना जाग आली…

प्रल्हाद हिवराळे

उमरी : व्हीपीके उद्योग समूहाचे अध्यक्ष मारोतराव कवळे यांनी जिरोणा व बितनाळ येथील आत्महत्याग्रस्त कुटूंबीयांची भेट घेतल्याची माहिती समजताच कधीतरी मतदारसंघात फेरफटका मारणाऱ्या आ. राजेश पवारांना अचानक जाग आली आणि त्यांनी जिरोणा येथे जावून आत्महत्याग्रस्त कुटुंबीयाची भेट घेतली. यावेळी त्यांचे सांत्वन करण्याऐवजी गावातील विकास कामाबद्दल माहिती विचरल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

तालुक्यातील आदर्श गाव जिरोणा येथील अल्पभुधारक शेतकरी प्रकाश पुंडलीक आकुलवाड यांनी दि. 13 जुन रोजी आत्महत्या केली. हि माहिती समजल्यानंतर व्हीपीके उद्योग समूहाचे अध्यक्ष मारोतरावं कवळे यांनी आत्महत्या ग्रस्त कुटूंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. आकुलवाड यांच्या दोन पाल्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेवून पतसंस्थेमार्फत पुढील शिक्षणासाठी व्हीं. पी.के.संस्थेच्या वतीने लागेल तेवढे आर्थिक मदत देण्याचाही शब्द दिला. त्याचबरोबर तातडीची अर्थिक मदतही यावेळी दिली. विशेष म्हणजे तहसीलदार उमरी यांना शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळवून देण्याच्या सुचना दिल्या.

कवळे गुरुजींनी अतिशय आपूलकीने व आपलेपणाची जाणीव ठेवत आत्महत्याग्रस्त कुंटूंबीयाप्रती मदतीचा हात पुढे केल्याची आणि मुलांच्या शिक्षणासाठी भरीव मदत करण्याचाही शब्द दिल्याने गावात जोरदार चर्चा होत होती.
कवळे गुरुजींच्या सकारात्मक कार्याची माहिती आ. राजेश पवार यांना मिळाली आणि आपला प्रतिस्पर्धी पुढे जात असल्याची जाणीव होताच आणि पाहूणे आल्यासारखे कधीतरी मतदारसंघात फेरफटका मारणाऱ्या आमदारास खडबडून जाग आली व त्यांनी सोबत एक रेती तस्कर तर दुसरा गाव पातळीवरील गुत्तेदारास सोबत घेऊन शेतकरी आत्महत्याग्रस्त जिरोणा व बितनाळ कुटूबीयांची नुसती भेट घेतली.

भेटी अंती आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटूबीयांना आर्थिक मदत सोडा साधी विचार पूस न करता गावातील अंतर्गत रस्ते व पाणी पुरवठा योजना आधी विषयी चर्चा केली.
सध्या तालुक्यात रस्ते व नाली बांधकामे गावोगाव चालू आहेत निवळ बोगस तर पाणी पुरवठा योजना अती बोगस. अशा योजनेचा फायदा गावक-यांना होत नसून या योजनेच्या नावाखाली आमदार, आधिकारी व गुत्तेदार हेच मामाला माल होताना दिसत आहे. बातमीचा वृत्तात एका रेती तस्कराला कळताच. आपले दुकान आमदारांच्या पडद्याड झाकण्यासाठी.

कळवळा दाखवून आपल्या आमदारांची तालुक्यात बदनामी होईल या दृष्टिकोनातून एका सोबत असलेल्या रेती तस्कराने जिरोणा गावात जाऊन त्या कुटूंबीयांना पाच हजाराची आर्थिक मदत दिले. हे चर्चेचा विषय तालुक्यात जोर धरला. लोकनायक मारोतराव कवळे गुरूजी यांनी भेटीच्या वेळी मारोती दर्शनवाड , साईनाथ येगलवाड उपसरपंच. प्रतिनिधी.मारोती उमाटे सरपंच बित नाळ .सुदाम बिटनाळकर आदी गावकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker