ताज्या बातम्याधर्माबादनांदेड

भूमिअभिलेख कार्यालय धर्माबादने केली शासनाची फसवणूक : अधिकारीच शासनाची फसवणूक करत असतील तर ते कुणाच्या फायद्यासाठी काम करत आहेत ?

सौ.मिना राजू भद्रे

धर्माबाद : न्यायप्रविष्ट प्रकरणात उपअधीक्षक भूमिअभिलेख यांनी धर्माबाद शहरातील नगरपालिका हद्दीतील गट क्रमांक 603 व 631 ची मोजणीसाठी शासन परिपत्रकानुसार मोजणी फिस भरणा करून न घेता शासानाचे तब्बल 24 लाखाचे नुकसान करुन शासनाची फसवणूक केली आहे. शासनाचे अधिकारीच शासनाची फसवणूक करत असल्याने ते कुणाच्या फायद्यासाठी काम करत आहेत असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

सदर प्रकरण हे न्याय प्रविष्ठ असून सदरील प्रकरणात प्रत्यक्ष स्थिती रेकार्डवर आणण्यासाठी न्यायालयाने आदेशाद्वारे कोर्ट कमिशनर म्हणून मा उपअधीक्षक साहेब भूमिअभिलेख कार्यालय धर्माबाद यांना नियुक्त करून मौजे बाळापूर तालुका धर्माबाद येथील नगरपालिका हद्दीतील सर्व्हे नंबर 603 व 631 ची मोजणी करून अहवाल न्यायालयात दाखल करण्याचे निर्देशित केले आहे.

न्यायालयाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयाकडून दोन्ही सर्व्हे नंबरच्या मोजणीसाठी तातडीची शासकीय फिस म्हणून 62 हजार रुपये भरण्यासाठी पत्र निर्गमित केले. सदर कार्यालयाच्या पत्राप्रमाणे व न्यायालयाच्या पूर्व परवानगीने दोन्ही गटातील व्यक्तींनी भूमी अभिलेख कार्यालयामध्ये मोजणी फिस म्हणून 62 हजार रुपये भरणा केली परंतु पहिल्या 2 हजार चौरस मीटरची तातडीची फिस 4 हजार आणि नंतरच्या प्रति 1 हजार चौरस मीटरची तातडीची फिस 2 हजार प्रमाणे आकारण्याचा प्रचलीत नियम आहे.

शासन परिपत्रकाप्रमाणे पहिल्या 2 हजार चौरस मिटर प्रमाणे 4 हजार व नंतरच्या प्रत्येकी 1 हजार चौरस मिटरप्रमाणे 2 हजार रुपये मोजणी फिस न आकारता केवळ 62 हजार रुपये मोजणी फिस भरणा करून घेतली. वास्तविक पाहता सव्हे नंबर 603 च्या क्षेत्रा नुसार एकूण मोजणी फिस 24 लाख 20 हजार एवढी होते. सर्व्हे नंबर 631 च्या क्षेत्रानुसार 17 हजार 400 रुपये एवढी होते.

दोन्ही गटाच्या क्षेत्रा ्नुसार 24 लाख 37 हजार 400 रुपये आकारण्याऐवजी स्वतःच्या फायद्यासाठी अर्थिक तडजोडी करुन केवळ 62 हजार रुपये मोजणी फिस भरून घेऊन शासनाची फसवणूक केली आहे. भूमि अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्याच्या खाबुगिरीमुळे शासनाचे जवळपास 24 लाखाचे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी सक्षम अधिकाऱ्यामार्फत उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालय धर्माबाद यांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी आणि नुकसान केलेली रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हणमंत जगदंबे यांनी उपजिल्हाधिकारी धर्माबाद व जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker