टि सी देण्यासाठी बारा हजाराचे कुलर मागितले : संस्थाचालक मनोहर पवार यांच्यासह प्राचार्याच्या विरोधात गुन्हा

New Bharat Times नेटवर्क
नायगाव : बारावी पासची टि सी देण्यासाठी १२ हजाराची लाच मागून तीन हजारावर तडजोड करणाऱ्या सोमठाणा ता. नायगाव येथील मा. दिनानाथ मंगेशकर विद्यालयाचे संस्थाचालक व प्राचार्याच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली असून. या प्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नायगाव तालुक्यातील सोमठाणा विद्या विकास शिक्षण प्रसारक मंडळ व मास्टर दिनानाथ मंगेशकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय असून. या संस्थेचे अध्यक्ष माजी प्राचार्य मनोहर पवार यांनी बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकाला टि सी देण्यासा ठी १२ हजाराच्या सिंफणी कंपणीच्या कुलरची मागणी केली. १२ हजाराचे कुलर देण्याची तयारी नसल्याने त्या विद्याथ्यांच्या पालकाने काल (ता.दोन) रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ता.२) रोजी लाचेची पडताळणी केली यासाठी संबधीत शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य बहिनाजी वरवंटे यांच्याशी संपर्क केला. वरवंटे यांनी संस्थाचालक मनोहर पवार यांच्याशी संपर्क साधून तडजोड करण्यात आली व तडजोडीअंती तीन हजार रुपये वरवंटे यांचेकडे देण्याचे पवार यांनी सांगितले. यावरून लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर तक्रारदार हे शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य बहिनाजी वरवंटे यांचेकडे त्यांच्या मुलीची टि.सी. संबंधाने बोलले असता त्यांनी मनोहर पवार यांच्या मागणी प्रमाणे लाच रक्कम घेवून या, असे म्हणून पंचासमक्ष ३ हजार रुपये लाच रक्कम देण्यास तक्रारदार यांना प्रोत्साहीत केले. प्रकरणात पोलीस स्टेशन कुंटूर, ता.नायगाव, जि.नांदेड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.