गुन्हे मागे घ्या अन्यथा उमरी ही बंद करू : आ.राजेश पवारांच्या विरोधात लिंगायत समाज एकवटला

New Bharat Times नेटवर्क
उमरी : धर्माबाद येथील लिंगायत समाजांच्या होतकरू मुलांवर विद्यमान आमदार राजेश पवार यांनी गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतीत उमरी तालुक्यातील सर्व लिंगायत समाज बांधवांनी आमदार राजेश पवार विरूद्ध दि.३ जुलै रोजी उमरीचे तहसीलदर प्रशांत थोरात व उमरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंकुश माने यांना धर्माबाद येथील गुन्ह्याच्या निषेधार्थ निवेदन दिले आहे.

आ.राजेश पवारांच्या एकाधिकारशाही विरुद्ध धर्माबाद येथे प्रचंड मोठा जन आक्रोश मोर्चा काढून लिंगायत समाजाने हुकूमशाही विरोधात आवाज उठवला. त्यानंतर उमरी तालुक्यातील लिंगायत समाज आ. राजेश पवार यांच्या हुकूमशाही व एकाधिकारशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचे सकल लिंगायत समाजाच्या वतीने निवेदन दिले आहे. धर्माबाद शहरातील ज्यावर गुन्हे दाखल झाले तो एक छोटा व्यवसायिक असून तो लिंगायत समाजाचा आहे.
महात्मा बसवेश्वर प्रिंटिंग प्रेस हानमंत कत्ते यांच्यावर आ.राजेश पवार यांनी खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो मागे घेण्यात यावे. अन्यथा गुन्हा मागे नाही घेतल्यास धर्माबाद सारखे आम्ही लिंगायत समाजाच्या वतीने रस्त्यावर उतरून उमरी तालुका बंद चे आहावान करण्यात येईल अशी वरील सविस्तर माहिती तहसीलदार व पोलीस निरीक्षक या अधिकाऱ्यांना निवेदन देताना लेखी माहिती दिले.
तसेच ता.४ जुर्ले रोजी धर्माबाद बंद च्या समर्थन देण्यासाठी उमरी तालुक्यातील लिंगायत समाज जवळपास पाच हजार तरुण व जेष्ठ मंडळी तसेच महिला ही धर्माबाद येथील मोर्चात सहभाग घेतल्याचे दिसून आले. यामध्ये डॉ. माधव विभुते, मारोती पाटील अनेराये, शिवाजी पाटील पचलिंग, धनराज पाटील चंदापुरे, रावसाहेब पाटील पचलिंग, विश्वाभर पाटील चंदापुरे, तानाजी पाटील अनेराये, संजय अनेराये, महेश पडोळे, किशन पाटील हाळे, शुभम पचलिंग, सोनू हुरणे, राजेंश विभुते,राजेश मोरे,यांच्यासह सर्व तालुक्यातील मोठ्या संख्येने लिंगायत समाज बांधव उपस्थित होते.
धर्माबाद सारखाच प्रकार उमरी तालुक्यातील मराठा समाजांच्या लोकप्रतिनिधी भागाच्या या नात्याने येथील मुलांनी मराठा आरक्षण बाबतीत आ.राजेश पवार यांना विचारणा केली असता आ.पवार यांनी मराठा समाजाच्या मुलांवर उमरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच उमरी तालुक्यातील अनेक सरपंचावर गुन्हे दाखल करण्यात आले. आ.राजेश पवार यांच्या एकाधिकारशाही अडेल वर्तीनेमुळे धर्माबाद तालुक्यासह उमरी तालुक्यातील ही मराठा व लिंगायत समाज आज घडीला नाराज असल्याने विधानसभेच्या निवडणुकीत भाजप पक्षाची मोठी हानी होईल च भाजप पक्षाची बदनामीही होताना दिसते.
पक्षश्रेष्ठींनी वेळीच दखल घेऊन आ.राजेश पवार बदल पक्षाच्या धोरणानुसार काय कारवाई करतील याकडे उमरी व धर्माबाद तालुक्यातील जनते लक्ष लागले आहे.