ताज्या बातम्यानांदेडनायगांव

विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरु

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव : महसूल विभागाचा सुधारीत आकृतीबंध दांगट समीतीच्या आवालातील शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात न करता लागू करण्यात यावा. यासह विविध मागण्यांसाठी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी दि.१२ रोजी पासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. दोन दिवसात मागण्या मान्य न झाल्यास सोमवार पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

महसूल कर्मचारी अनेक वर्षापासून आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मागत होते पण विविध कारणे देवून शासन आजपर्यंत प्रलंबित मागण्या पुर्ण करण्याची तयारी दाखवत नव्हते त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी दि. १० जुलै पासून संपाचे हत्यार उपसले असून टप्प्याटप्प्याने आंदोलनाची तिव्रता वाढवल्या जाणार आहे. पहील्या टप्प्यात दि. १० रोजी काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले तर दुसऱ्या टप्प्यात काल दि.११ रोजी दुपारी लंच टाईममध्ये मागण्या संदर्भात निदर्शने करण्यात आली आणि तिसऱ्या टप्प्यात दि.१२ पासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे.

महसूल कर्मचाऱ्यांनी मागच्या अनेक वर्षांपासून शासनाकडे मराठवाडा विभागातील अव्वल कारकून/मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार या पदावर तात्काळ पदोन्नती देण्यात यावी, महसूल विभागाचा आकृतीबंध तात्काळ लागू करण्यात यावा, नायब तहसिलदार संवर्ग हा राजपत्रीत संवर्ग असून सुध्दा त्यांची वेतनश्रेणी वर्ग तीन संवर्गाची देण्यात आलेली आहे ती बदल करुन ती ४८०० करण्यात यावी.

कर्मचान्यांचे वेतन नियमितपणे प्राधिकारपत्रावर पाठवण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा, महसूल सहाय्यक व तलाठी ही पदे जिलास्तरीय व समकक्ष अर्हताधारी असूनही महसूल सहाय्यक यांचा ग्रेडपे १९०० व तलाठी यांचा ग्रेड २४०० आहे. त्यामुळे महसूल सहाय्यक यांचा ग्रेडपे २४०० करण्यात यावा यासह अन्य विविध मागण्यासाठी नायगाव तहसील कार्यालयातील महसूल कर्मचारी दि.१२ पासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे.

या काम बंद आंदोलनात सर्व महसूल अर्चना दराडे अ.का.उपाध्यक्ष जिल्हा नांदेड, लक्ष्मण टेकाळे अ. का. संध्या मांजरमे, रोशन सिंग ग्रंथी अ.का, देवकते ए, ईनूस शेख, कैलास इंगोले, हिना शेख, पांपटवार एस, दीपक वाघमारे व कोतवाल संघटना व चतुर श्रेणी संघटना
महसूल कर्मचारी संघटना सहभागी झाली होती.

दोन दिवसात महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास ते ( ता.१५ ) पासून बेमुदत संपावर जाणार असल्याने महसूल विभागाच्या कामकाजावर परिणाम तर होणारच आहे पण मुख्यमंत्री लाडकी बहिण या योजनेचे कामाला ब्रेक लागणार असल्याचे दिसून येते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker