ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

राज्यातील गट, समूह समन्वयकांना कायमस्वरूपी सेवेत घेणार – गुलाबराव पाटील

गट व समूह समन्वयक कर्मचारी मेळावा...

बाळासाहेब शिंदे

मारतळा :- मागील अडीच वर्षात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाअतंर्गत जनतेच्या हिताचे निर्णय घेतले असून गट व समूह समन्वयक कर्मचाऱ्यांना मानधन १३ हजारांवरून २५ हजार करण्यात आले. त्याचप्रमाणे राज्यातील ६१४ गट व समूह समन्वयक कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

यावेळी मानधन वाढविल्याबद्दल मंत्री गुलाबराव पाटील यांचा दि. ७ जुलै रोजी जळगाव येथे संघटनेच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते

महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्र पाणी व स्वच्छता कंत्राटी कर्मचारी संघटना यांची रविवारी जळगाव येथे
वार्षिक राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्यातील सर्व गट संसाधन केंद्रातील गट समन्वयक व समूह समन्वयक कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष संघटनेचे राज्याध्यक्ष विलास निकम,राज्य सचिव जयंत वर्मा, राज्य संघटनेचे सर्व पदाधिकारी व सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष व सचिव आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन जितेंद्र महाजन व शिरीष तायडे यांनी केले. प्रास्ताविक राज्याध्यक्ष विलास निकम यांनी केले. आभार जिल्हाध्यक्ष सपना राजपूत यांनी मानले. या मेळाव्याला नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर आदीसह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील गट संसाधन केंद्र पाणी व स्वच्छता कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker