राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर सोमवारी बालाजी थोटवे यांचे व्याख्यान

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : प्रा.डॉ.शंकर गड्डमवार, रविंद्र भालेराव, गंगाधर मावले आणि वसंत बोनागिरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन दि.15 जुलै रोजी सोमवारी संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये लसाकमचे राज्याध्यक्ष तथा जेष्ठ विचारवंत मा.बालाजी थोटवे यांचे नवीन शैक्षणिक धोरण : बहुजनासाठी तारक की मारक या विषयावर छ.राजर्षी शाहु वैचारिक सभागृह, शाहु नगर (डॉ.शंकर गड्डमवार यांचे राहाते घर ) येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या धोरणासंबंधी संसदेमध्ये अथवा इतरत्र सविस्तर चर्चा होऊ शकली नाही पण महाराष्ट्र शासनाने त्याची अंमलबजावणी जून,2024 पासून सुरू केली आहे म्हणून बहुजन समाजातील प्रत्येक घटकापर्यन्त या धोरणाची फलश्रूती व परिणाम काय होतील या अनुषंगाने जनजागरण करण्यासाठी प्रा.डॉ.शंकर गड्डमवार यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित, रविंद्र भालेराव यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित, गंगाधर मावले यांच्या 58 व्या वाढदिवसानिमित आणि वसंत बोनागिरे याच्या 48 व्या वाढदिवसानिमित संयुक्तिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तरी बहुजन समाजातील बुद्धिजिवी वर्गानी या अतिशय महत्वाच्या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन रामकिशन मेटकर आणि भीमराव बैलके यांनी केले आहे.