नरसीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची आढावा बैठक संपन्न

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नायगाव तालुक्याची आढावा बैठक जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दादा भिलवंडे यांच्या निवासस्थानी संपन्न झाली. यावेळी दत्ताहरी कदम चोळाखेकर नायगाव विधानसभा अध्यक्ष, चाँद पाशा सय्यद नायगाव विधानसभा कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
या आढावा बैठकीला राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी, राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष विक्रम नागशेट्टीवार, राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे नायगाव तालुकाध्यक्ष विश्वनाथ बडुरे, युवक जिल्हासंघटक जितेंद्र काळे, जिल्हा सरचिटणीस बालाजी चोंडे, श्याम पा.चोंडे, नांदेड दक्षिण तालुकाध्यक्ष पांडुरंग क्षिरसागर, ज्ञानेश्वर कदम, विठ्ठल कळके, गजानन गोरख, माधव कोरे, पांडुरंग बागडे, दानीस शेख, सद्दाम पटेल, अझर शेख, शमशुद्दीन शेख, रमाकांत सूर्यवंशी, दिलीप मोरचोडे, साईनाथ बावणे, बंटी डूमणे यांची उपस्थिती होती.
यावेळी पक्ष बांधणी व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या द्रष्टीने चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीचा आढावाही यावेळी घेण्यात आला. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला मिळालेल्या यशामुळे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यात उत्साह दिसून आला. त्यामुळे पक्ष विस्तार करतांना नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी सचिन उपाशे तालुका कार्याध्यक्ष नायगाव, माधव देवकर शहराध्यक्ष नायगाव.
मनोज कदम शहर उपाध्यक्ष, श्याम पवार तालुका उपाध्यक्ष, मुबीन शेख तालुका चिटणीस, तुळशीदास पांचाळ कोषाध्यक्ष, निलेवार हानमंत सोशल मीडिया तालुकाध्यक्ष, मुकेश रेड्डी तालुका उपाध्यक्ष, दिपक खेळगे तालुका सरचिटणीस, गणेश पांचाळ तालुका सचिव, अनिल कांबळे संघटक, अजित शिंदे सरचिटणीस, शंकर चापलवाड सहसचिव, आकाश घारके सह चिटणीस, गजानन जाधव ता.सचिव पदी यांची निवड करण्यात आली आहे.सदरच्या बैठकीचे आयोजन तालुकाध्यक्ष गजानन पवार यांनी केले होते.