गावाकडच्या बातम्यानांदेडनायगांव

बेंद्री गाव एक महिण्यापासून अंधारात…

युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गांधीगिरी करुन कामचुकार अधिकाऱ्यांचे दर्शन घेवून सत्कार केला दर्शन लाईट ऑफिसचे, नायगाव विधानसभा युवक काँग्रेसचे आगळेवेगळे आंदोलन

प्रकाश माहिपाळे

नायगाव :- मागच्या एक महिण्यापासून नायगाव तालुक्यातील बेंद्री येथे विद्यूत पुरवठा बंद असल्याने गाव तर अंधारात आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट होत असून आटा चक्की बंद आहेत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असताना विज वितरण कंपनीचे अधिकारी काहिच हालचाली करत नसल्याने युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गांधीगिरी करत कामचुकार अधिकाऱ्यांचे दर्शन घेवून त्यांचा सत्कार केला आणि विद्यूत पुरवठा सुरु करण्याचे साकडे घातले.

बेंद्री गावचा विद्यूत पुरवठा सुरळीत करण्यात यावा यासाठी ग्रामस्थांनी विज वितरण कंपनीच्या नायगाव येथील अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी अनेकवेळा फोन केला पण काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्याचबरोबर या भागाचे आमदार राजेश पवार यांना फोन करुन बंद असलेल्या विज पुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी असंख्य नागरिकांनी फोन केला पण आमदार महोदयांनी एकाही ग्रामस्थांच्या फोनला प्रतिसाद दिलेला नाही. उलट नागरिकांना देवदर्शनाला घेवून गेल्याचा डांगोरा पिटत असल्याने बेंद्रीच्या ग्रामस्थांनी नागरिकांचे प्रश्न सोडवणे तर दुरच राहीले पण फोनही घेत नसल्याने आमदार राजेश यांच्याबद्दल कमालीचा संताप व्यक्त करत आहेत.

नायगाव तालुक्यातील बेंद्री हे गाव मागच्या एक महिण्यापासून आंधारात आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट होत असून आटा चक्की बंद आहे, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असताना विज वितरण कंपनीचे अधिकारी काहीच हालचाली करत तर लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे या प्रकरणी युवक काँग्रेसचे रवींद्र पाटील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीनिवास पाटील चव्हाण यांच्या उपस्थितीत युवक काँग्रेसचे रावसाहेब पाटील शिंदे मांजरमकर.

काळबा पाटील कदम, बाबाराव पाटील कदम विलास पाटील कदम बेंद्री, संदीप पाटील रातोळीकर,साई पाटील मोकासदरेकर, गावचे उपसरपंच नागोराव पाटील कदम, आत्माराम पाटील बेंद्रीकर, विलास पाटील बेंद्रीकर, शरद पाटील बेंद्रीकर, सुनील पाटील बेंद्रीकर, नागनाथ आप्पाराव पाटील कदम, नारायण हरी पाटील बेंद्रीकर, मारुती पाटील कदम, दशरथ कसबे,राजेश पाटील हंबर्डे, मानसिंग पाटील ताटे, केशव पाटील वडजे, योगेश पाटील गडगेकर, परमेश्वर पाटील बेंद्रीकर, मोहन पाटील पवार होटाळकर अदि.

कार्यकर्त्यांनी मंगळवारी गांधीगिरी करुन धडा शिकवण्यासाठी ‘दर्शन लाईट ऑफिसचे’ अशी मोहीम राबवून विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि कामचुकारपणा करण्यात तरबेज असल्याचे निदर्शनास आणून दिले व उप कार्यकारी अभियंता अनिलकुमार तिवारी व अन्य एका अभियंत्याचा सत्कार केला व तत्काळ विजपुरवठा सुरळीत करण्यासाठी साकडे घातले.

युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेगळ्या पद्धतीने विज वितरण कंपनीच्या कामचुकार अधिकाऱ्यांचा सत्कार करुन गांधीगिरी केल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे. यापुढे अशाच पद्धतीने दर्शन आँफीसचे या सदराखाली गांधीगिरी करुन भ्रष्ट व कामचुकार अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यात येणार आहे.

रावसाहेब शिंदे, युवक काँग्रेस पदाधिकारी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker