कुंटूरच्या साने गुरुजी प्रबोधन व्याख्यानमालेत सूर्यकांताताई पाटील यांचे व्याख्यान

New Bharat Times नेटवर्क
कुंटूर :- येथील पू. साने गुरुजी संस्कारमाला सार्वजनिक वाचनालय व प्रतिष्ठान च्या रौप्य महोत्सवानिमित्त स्व.गंगाधरराव कुंटुरकर स्मृती समारोह व साने गुरुजी प्रबोधन व्याख्यानमाला आयोजित केली आहे.
दि. ३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता होणाऱ्या या समारंभात जिल्ह्यातील फरड्या वक्त्या माजी मंत्री तथा स्व.कुंटुरकर यांच्या सोबत अनेक वर्षे राजकारणात कार्यरत असलेल्या सूर्यकांताताई पाटील यांचे ‘स्व. गंगधरराव कुंटूरकर : व्यक्तित्व आणि कर्तृत्व’ या विषयावर व्याख्यान संपन्न होणार आहे. या समारंभाचे अध्यक्ष म्हणून माजी मंत्री तथा विचारवंत वक्ते माधवराव किन्हाळकर उपस्थित राहणार आहेत.
तर यावेळी ज्येष्ट बाल साहित्यिक डॉ. सुरेश सावंत, कुंटुरकर शुगरचे चेअरमन राजेश देशमुख कुंटुरकर, सूर्यकांत पा.कदम, सूर्याजी पा.चाडकर, शिवाजी पा.होळकर, बाबुराव पा.आडकीने, सरपंच आशाताई कदम, बालाजीराव पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्व.गंगाधरराव कुंटूरकर यांच्या कर्तृत्वशाली व्यक्तिमत्तवाची नव्या पिढीला ओळख व्हावी, त्यांच्या स्मृती चिरंतन जाग्या राहाव्यात यासाठी हे व्याख्यान महत्त्वाचे आहे.
या सोहळ्यात चळवळीच्या साने गुरुजी सेवा सन्मान २०२४ हे पुरस्कार बीड येथील समाजसेवक दत्ता बारगजे, डॉ. बालाजी कोंपलवार, रेखाताई कांबळे यांना तर वाड्मय पुरस्कार २०२४ हे लातूरचे भारत सातपुते व नांदेडच्या मीनाक्षी आचमे- चित्तरवाड यांना प्रदान केले जाणार आहेत.
तरी कुंटूर व परिसरातील सर्व नागरीकांनी मोठ्या संख्येने या वैचारीक मेजवानीचा नक्की लाभ घ्यावा असे आवाहन या सोहळ्याचे निमंत्रक रुपेश देशमुख कुंटूरकर, संयोजक मारोतराव कदम, कार्यवाह विनोद झुंजारे, सहकार्यवाह शिवाजी आडकीने, डॉ.बाळू दुगडूमवार, राजेश आडकीने यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी आवाहन केले आहे.